esakal | केंद्रीय शिक्षण संस्थांमधील राखीव प्रवर्गातील पदे भरा; मंत्रालयाचे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University

केंद्रीय शिक्षण संस्थांमधील राखीव प्रवर्गातील पदे भरा; मंत्रालयाचे पत्र

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : देशातील सर्व विद्यापीठे(university) , आयआयटी(IIT), एनआयटीसारख्या (NIT) संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील रिक्त जागा (schedule cast vacant post) तातडीने भराव्यात. यासाठी प्रत्येक संस्थांनी या जागा भरण्यासाठी आपल्या स्तरावर विशेष कार्यक्रम (special event) हाती घ्यावा, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (central education ministry) सर्व शिक्षण संस्थांना पत्र (letter) पाठवले आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 441 नव्या रुग्णांची भर; 3 जणांचा मृत्यू

मागील अनेक वर्षांपासून देशातील विद्यापीठे, नामांकित शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा रिक्त असून त्याची माहिती नुकतीच लोकसभेच्या अधिवेशनात समोर आली होती. मागास प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागांवरून देशभरातून टीका सुरू झाल्याने त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांनी याबाबत सर्व संस्थांना आपल्याकडे रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पत्र लिहिले आहे.

या कालावधीत भरा जागा

सचिवांनी लिहिलेल्या पत्रात मागास प्रवर्गातील सर्व रिक्त जागांवर भरती करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी ५ सप्टेंबर २०२१ ते ४ सप्टेंबर २०२२ हा एक वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत या सर्व प्रवर्गातील रिक्त पदांवरील जागा भरण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कृती आराखडाही मागवला

ही पदभरती करण्यासाठी कोणता कृति आराखडा तयार करणार याची माहितीही त्यांनी शिक्षण संस्थांकडून मागितली आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये रिक्त पदांचा तपशील, या रिक्त पदांच्या भरतीबाबत वित्त समिती, नियामक मंडळ, व्यवस्थापन मंडळाच्या बैठकींत चर्चा झालेला तपशील सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर या पद भरतीबाबत महिन्या भरात केलेल्या कार्यपद्धतीचा अहवालही सादर करण्याची सूचना या पत्रात केली आहे.

loading image
go to top