सिईटीची तयारी पुर्ण, बेळगाव जिल्ह्यातील २९ केंद्रावर परीक्षा

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला गुरूवार ( ता. १६ ) पासून सुरुवात होणार.
cet exam
cet examsakal
Summary

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला गुरूवार ( ता. १६ ) पासून सुरुवात होणार.

बेळगाव - व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला गुरूवार ( ता. १६ ) पासून सुरुवात होणार असून कर्नाटक परीक्षा प्राधिकारने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील २९ परिक्षा केंद्रावर सीईटी पार पडणार असून बेळगाव जिल्ह्यातील ११७८४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

इंजिनीरिंग, आर्किटेक्टसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देताना सीईटी परीक्षेतील गुणवत्ता महत्वाची ठरते. त्यामूळे बारावीची परीक्षा झाल्यापासून विद्यार्थ्यांनी सिईटीची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कर्नाटक परिक्षा प्राधीकारने देखील परीक्षा सुरळीतपणे पार पडावी. यासाठी उपाय योजना केली आहे. कोरोनाचे संसर्ग कमी झालेला असला तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून सिईटी घेतली जाणार आहे. तसेच एका खोलीत फक्त चोवीस विद्यार्थ्यांची बसण्याची सोय केली जाणार असून सर्व केंद्रावर शौचालय स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय यासह इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील पंधरा केंद्रांवर तर चिक्कोडी येथील १४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बेळगाव शहरांमध्ये सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून खानापूर व कित्तूर तालुक्यामध्ये परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे बारावीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. त्यामुळे सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. मात्र ज्यावेळी बारावीची परीक्षा सुरळीत पार पडली असून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक दिवसांचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने सीईटीला सामोरे जाणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता परीक्षेला सुरुवात होणार असली तरी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आले असून परीक्षा केंद्रांवर शांतता कायम राहावी याकरिता केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात 144 कलम लागू असणार आहे. तसेच सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त असणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे

विभाग- परीक्षा केंद्र - विद्यार्थी संख्या

बेळगाव शैक्षणिक जिल्हा -१५ - ६०९६

चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा - १४ - ५६८८

एकूण - २९ - ११७८४

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

गुरूवार ( ता. १६ ) - सकाळी १०.३० ते ११.५० - जीवशास्त्र

गुरूवार ( ता. १६ ) - २.३० ते ३.५० - गणित

शुक्रवार (ता. १७) - १०.३० ते ११.५० - भौतिक शास्त्र

शुक्रवार (१७ ) - २.३० ते ३.५०

शनिवार (ता. १८) - १०.३० ते ११.५० - कन्नड

सीईटी परीक्षेची सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सिईटी घेतली जाणार असून जिल्ह्यातील अकरा हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

- एन व्ही नागराज, जिल्हा पदवीपुर्व शिक्षणाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com