स्पर्धा परीक्षेच्या क्लासचा पॅटर्न बदलला!

राज्यातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन वर्गांना पसंती; कोरोनामुळे घरच्या घरी बसून अभ्यास
स्पर्धा परीक्षेच्या क्लास
स्पर्धा परीक्षेच्या क्लासsakal

स्वारगेट : कोरोनामुळे गेल्या काळात ऑफलाइन क्लासचालकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील ऑनलाइन क्लासला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक क्लासचालक ऑनलाइन क्लास घेण्यास पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनापूर्वीच्या ऑफलाइन क्लासपेक्षा सध्याच्या ऑनलाइन क्लासला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे क्लासचालकांनी सांगितले.

कोरोना आला आणि भरगच्च भरणारे स्पर्धा परीक्षेचे क्लास लॉकडाउनमुळे एकाकी बंद झाले. जवळपास गेली पंधरा महिने ऑफलाइन क्लास बंद होते. याला पर्याय म्हणून क्लासचालकांनी ऑनलाइन क्लास सुरू केले. मात्र, सुरुवातीच्या काळात याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून ऑनलाइन क्लासला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ॲकॅडमीच्या माध्यमातून एकाच वेळी हजारो मुले ऑनलाइन क्लाससाठी जॉईन होत असल्याचे क्लास चालकांकडून सांगण्यात आले.

स्पर्धा परीक्षेच्या क्लास
वाळुंज ग्रामस्थांना मिळाली प्रॉपर्टीची सनद , राज्यात पहिलाच उपक्रम

क्लासचालकांच्या खर्चातही बचत

ऑफलाइन क्लासच्या तुलनेत ऑनलाइन क्लास घेण्याचा खर्च कमी आहे. जो खर्च करावा लागतो, तोदेखील एकदाच करावा लागतो. ऑनलाइन क्लासला हॉलचे भाडे द्यावे लागत नाही. यामुळे बऱ्याच क्लासचालकांची ऑफलाइन क्लासऐवजी ऑनलाइन क्लासला पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऑनलाइन क्लासला प्रतिसाद का?...

  • या क्लाससाठी तुम्ही कोठूनही जॉइन होऊ शकता.

  • शहरात येऊन राहण्याचा हजार रुपयांचा खर्च वाचतो.

  • कोरोनामुळे शहरात विद्यार्थ्यांना येण्यास पालकांचा विरोध

  • ऑफलाइन क्लासपेक्षा ऑनलाइन क्लासला फी कमी.

  • क्लासचालकांच्या शिकविण्याच्या नावीन्यपूर्ण पद्धती

  • एका विषयाचा व्हिडिओ अनेक वेळा पाहता येतो.

या क्लासचे तोटे...

  • एखादी संकल्पना समजली नाही, तर पुन्हा विचारण्याची सोय नाही.

  • शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर लक्ष राहत नाही

  • ग्रामीण भागात अद्यापही इंटरनेटचा अडथळा

  • शिक्षकांना विद्यार्थ्यांशी प्रत्येक्ष संवाद साधण्यात अडचणी

मी पुणे शहरात काही वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. परंतु, कोरोनामुळे मला पुण्यात येता आले नाही. मी काही विषयाचे क्लास सध्या ऑनलाइन करत आहे. या सुविधेमुळे मला घरी बसून अभ्यास करणे शक्य झाले आहे.

- पंकज गवळी, स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी

मी आताच एका विषयाचा ऑनलाइन क्लास केला. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनमध्ये क्लासमध्ये शिकविलेले जास्त समजते. मात्र, ऑनलाइनमुळे ग्रामीण भागातील मुलांना घरी बसून क्लास करता येत आहेत .

- दिनेश माने, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

विद्यार्थ्यांचा गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन क्लासला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासासाठी शहरात येण्याची गरज नाही. तसेच खर्चही कमी येत असल्याने या क्लासमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

- ज्ञानेश्वर पाटील, स्पर्धा परीक्षा क्लासचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com