CSIR NET 2021 : सीएसआयआर परीक्षेच्या तारखेची अखेर घोषणा; पहा अधिक माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSIR NET 2021

सीएसआयआर परीक्षेच्या तारखेची अखेर घोषणा; पहा अधिक माहिती

पुणे : वर्षभरापासून लांबलेली वैज्ञानिक आणि औद्यागिक संशोधन परिषदेची (सीएसआयआर) राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अखेर घोषित (नेट) करण्यात आली आहे. २९ जानेवारीला ही परीक्षा पार पडेल असे सीएसआयआरच्या वतीने ट्वीटरद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: पंजाब, राजस्थानप्रमाणं राज्यातही इंधन करकपात करा; काँग्रेसची मागणी

सहायक प्राध्यापक पदासाठी तसेच संशोधन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीची ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा गरजेचे आहे. विज्ञान शाखेतील विषयांसाठी सीएसआयआरच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर नेटची परीक्षा घेण्यात येते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनदा होणारी नेट परीक्षा या वर्षीही एकदाही झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

हेही वाचा: Register now : बीटेकमध्ये करिअरच्या संधी; MIT-WPU मध्ये वेबिनार

रखडलेल्या नेट परीक्षेबद्दल सकाळनेही दखल घेत वृत्त दिले होते. आता सीएसआयआरच्या या ट्वीटमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षेचे सविस्तर माहिती लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

loading image
go to top