‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत वाढविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PERA_CET
‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत वाढविली

‘पेरा सीईटी’चे अर्ज भरण्याची मुदत २३ मे पर्यंत वाढविली

पुणे - राज्यातील खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या ‘पेरा सीईटी सेल’तर्फे २६ ते २८ मे दरम्यान ‘पेरा सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २३ मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अभियांत्रिकी, बायो-इंजीनियरिंग, मरिन इंजीनियरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर, विधी आणि कृषी अभियांत्रिकी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी २०२२ परीक्षेचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा नियोजित कालावधीत ऑनलाईन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे. तसेच परीक्षेचा निकाल ३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पेरा इंडिया’चे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, ‘पेरा’चे उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी दिली.

‘पेरा ही खासगी विद्यापीठांची संघटनेने दरवर्षीप्रमाणे यंदा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १५ खासगी विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले आहे.

Web Title: Deadline For Filing Applications For Pera Cet Has Been Extended To May 23

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top