पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदत

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
Admissions process
Admissions processesakal

धुळे : बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष (पोस्ट एचएससी) पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना आठ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या गुणवत्ता याद्या ११ जुलैला, तर अंतिम गुणवत्ता यादी १५ जुलैला जाहीर होईल.

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करता पोस्ट एचएससी पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते असे ः ८ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी, कागदपत्राच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्‍चिती, ११ जुलै : विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे, १२ ते १४ जुलै : गुणवत्ता याद्यांच्या संदर्भात तक्रार असल्यास त्या सादर करणे, १५ जुलै : अंतिम गुणवत्ता याद्या सुस्पष्टपणे प्रदर्शित करणे.

Admissions process
बारावीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी शिक्षणाची संधी
Admissions process
यंदा बारावीपर्यंतच्या वर्गांना 100 टक्के पाठ्यक्रम लागू !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com