App-Entrepreneurship : नववर्धिष्णु अॅपप्रेन्युअरशिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Tatpuje writes App-Entrepreneurship is New Age Tech  Entrepreneurship education entrepreneur

App-Entrepreneurship : नववर्धिष्णु अॅपप्रेन्युअरशिप

- प्रा. डॉ. दीपक ताटपुजे

अॅ पप्रेन्युअरशिप (अॅप-आंत्रप्रेन्युअरशिप) ही नव्या युगाची नवतंत्रउद्योजकता आहे. हे क्षेत्र उद्योजकता आणि डिजिटल अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एकत्रीकरण असून अॅपप्रेन्युअर हा खासकरून एक उद्योजक असतो. तो संगणक, मोबाईल डिव्हाईस अॅप्लिकेशन उद्योगात तसेच उदयोन्मुख मायक्रोपेमेंट अर्थव्यवस्थेत काम करतो आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी अॅप्स तयार करून अथवा ॲप्सद्वारे विविध सेवा देत पैसे कमावतो.

अॅपप्रेन्युअर हे सामान्य उद्योजकांपेक्षा वेगळे असतात. कारण त्यांची व्यावसायिक जीवनशैली व्हर्चुअल आणि तंत्रज्ञानाभिमुख असते. सेट केलेले अॅप व्यवसाय स्वतः चालवताना कोणत्याही कामाच्या व्यत्ययापासून पूर्णपणे मुक्त असलेली ही व्यावसायिक नावीन्यपूर्ण जीवनशैली आहे. अॅप स्टोअर समजून घेणे हे अॅपप्रेन्युअर बनण्याचा महत्त्वाचा पैलू आहे, कारण अॅप व्यवसाय जिथे राहणार आहे, अथवा जिथून चालणार आहे, ते नेमके कसे कार्य करते हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक अॅप डेव्हलपर आहेत जे या संशोधन करण्यात यशस्वी ठरतात. अॅप मार्केट समजून घेण्यासाठी मार्केटप्लेस समजून घेणे, अॅप्स डाउनलोड करणे, विविध प्लॅटफॉर्मशी संलग्न होणे अशी अनेक तंत्रज्ञान नवकार्ये या व्यवसायात महत्त्वाची आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात अनेक नवकौशल्यांची निर्मिती झाली आहे.

या क्षेत्रात विश्लेषण एसडीके, जाहिरात नेटवर्क आणि रेटिंग टूल्सची आवश्यकता असते. त्यासाठी अॅपसी, फ्लुरी सारखी टूल्स आणि कौशल्यांचा उपयोग होतो. अॅप्सच्या सर्व्हर-साइड इंटिग्रेशनसाठी आवश्यक पार्स किंवा की सारखे चांगले ‘बॅकएंड अॅज एक सर्व्हिस’ टूल्स उपयोगी आहेत. योग्य ट्रॅकिंग आणि कमाई साधने एकत्रित केल्यावर, अॅप अॅनी किंवा सेन्सर टॉवर सारख्या चांगल्या ‘अॅप स्टोअर ऑप्टिमायझेशन’ या टुल्सची आणि कौशल्यांची आवश्यकताही तेवढीच महत्त्वाची आहे. हे करण्यासाठी योग्य कीवर्ड शोधून, विकसित अॅपला सूचीबद्ध करण्‍यासाठी सर्वोत्‍तम श्रेणी आणि अर्थातच अ‍ॅप्सचा आणि प्रतिस्पर्ध्यांचा मागोवा घेण्‍याची क्षमता शोधून अ‍ॅप स्‍टोअरवर ‘पोझिशनिंग ऑप्टिमाइझ’ करण्‍याचे कौशल्य हे व्यवसाय वाढीस उपयोगी आहे.

मोबाईल अॅप विश्लेषणासाठी गुगल ॲनालायटिक्स व तत्सम टूल्स ही वापरकर्त्याच्या चांगल्या अनुभवासाठी मदत करू शकतात आणि अधिक प्रतिबद्धताही वाढवतात. आयओएस आणि अॅनड्रॉईडसाठी फ्लररी याहूचे टुल हे मोबाईल अॅप्लिकेशन्ससह ग्राहकांच्या परस्परसंवादाचे विश्लेषण करण्यास मदत करते. आयओएस आणि अॅनड्रॉईडसाठी चतुर टॅप हे वापरकर्त्याचे वैयक्तिक वर्तन समजण्यास मदत करते. अॅपल अॅप अॅनालिटिक्स हे मार्केटिंग मोहिमा आणि वापरकर्ता प्रतिबद्धता मोजण्यात मदत करते. ‘आयओएस’साठी मिक्सपॅनेल हे ग्राहकांचे वर्तन समजण्यास मदत करते. परंतु व्यवसायाच्या संदर्भात, आयओएस आणि अॅनड्रॉईड अॅप्ससाठी फेसबुक अॅनालिटिक्स हे टुल, विकसित अॅप किती लोक वापरत आहेत, कोणता वयोगट, लिंग, देश, भाषा आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी उपयोगी पडते.

आयओएस आणि अॅनड्रॉईडसाठी लोकॅलिटिक्स हा मोबाईल ‘अॅप प्रतिबद्धता प्लॅटफॉर्म’ जो वापरकर्ते मिळविण्यास, व्यग्र ठेवण्यास, वाढण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतो. आयओएस आणि अॅनड्रॉईडसाठी काउंटली हे टुल एंटरप्राइझ मोबाईल आणि वेब अॅनालिटिक्स, मोबाईल परफॉर्मन्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म, वापरकर्ते प्रोफाइल आणि विपणनासाठी वापरात आहे. आपण अॅप विकसित आणि प्रकाशित करत आहोत त्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर खाते तयार करण्यात अयशस्वी झाल्यास अॅपप्रेन्युअर बनणे अशक्य आहे. गुगल तसेच अन्य अॅपस्टोअरवर नोंदणी करण्यासाठी वार्षिक वर्गणी, अटी व शर्ती देखील मान्य करून वर्षभरात आवश्यक तेवढे अॅप्स प्रकाशित करणे सहज शक्य आहे. एका सर्वेक्षणानुसार, २०१८मध्ये जागतिक मोबाईल अॅप्लिकेशन बाजाराचा आकार हा साधारण शंभर अब्ज डॉलर एवढा होता आणि २०२६ पर्यंत साधारण ४०० बिलियन डॉलर्सहून अधिक होण्याचा अंदाज आहे त्यामुळेच या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत.