वेळ आहे तर लागा कामाला; लॉकडाउननंतर 'या' क्षेत्रात आहेत भरपूर संधी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

आपल्याला कौशल्ये शिकण्यात अधिक वेळ घालविण्याची गरज नाही. त्यासाठी, आपण एक महिना किंवा काही आठवड्यात शिकू शकाल, असा प्रोग्राम शोधायला पाहिजे.​

नववर्षाच्या सुरवातीला जानेवारी महिन्यापासून सर्व जगभर कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे या विषाणूवर कोणताच इलाज उपलब्ध नसल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली. आणि त्याचाच मोठा फटका अर्थव्यवस्थेला देखील बसला असून, अनेकजणांवर आपली नोकरी गमावण्याची अथवा मिळणाऱ्या वेतनावर कमी-अधिक प्रमाणात पाणी सोडण्याची वेळ आली. त्यामुळे लॉकडाउनच्या निमित्ताने मिळालेला पुष्कळसा वेळ वाया न घालवता, नवीन कौशल्य शिकण्यात किंवा गुंतवणूक करून मार्गी लावू शकता.

पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'

कोरोनामुळे उद्भवलेल्या या बिकट प्रसंगामुळे दुर्दैवाने, जर आपली नोकरी गमावली तर आपण काय करणार आहात? आणि जेव्हा पुढील काळात गोष्टी सामान्य होतील आणि आपण नवीन नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडाल, तेव्हा बदललेल्या अनेक गोष्टींसाठी आपण तयार आहात का? यांसारख्या प्रश्नांचा विचार करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे खचून न जाता, त्यासाठी तयारी करण्याची ही उत्तम वेळ आहे. यासाठी लॉकडाऊनच्या दरम्यान ही ५ कौशल्ये आपण नक्कीच आत्मसात करू शकता. 

चंबळमधलं गुंडाराज संपवणाऱ्या IPS अधिकाऱ्याने केलं विकास दुबेच्या एन्काउंटरचं नेतृत्व​

ही पाच नवीन कौशल्ये शिकण्यास सुरवात करण्यापूर्वी काही निकष ठरवणे महत्त्वाचे आहे. याकरिता सर्वात आधी आपल्या जीवनावर आणि कारकीर्दीवर त्वरित परिणाम करणारी कौशल्ये शोधून, आपल्या व्यवसाय अथवा कारकीर्दीवर लगेच अमलात आणू शकणाऱ्या गोष्टींची निवड करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कौशल्ये शिकण्यात अधिक वेळ घालविण्याची गरज नाही. त्यासाठी, आपण एक महिना किंवा काही आठवड्यात शिकू शकाल, असा प्रोग्राम शोधायला पाहिजे. त्यानंतर लॉकडाउनच्या काळात बाहेर पडता येणे शक्य नसल्याने घरातल्या घरात शिकू शकणार्‍या कौशल्यांचा शोध घ्यावा. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोकळ्या वेळेत आपल्याला पाहिजे असलेली आवडीची कौशल्ये आपण शिकू शकता. 

लॉकडाउनमध्ये ऑनलाइन इंटरव्ह्यू देताय? या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा​

No photo description available.

तुम्ही ब्लॉग लिहिण्यास प्रारंभ करू शकता
ब्लॉगिंग आता एखाद्या छंदापेक्षा काही कमी नाही. खरंतर, पॅट फ्लाइन, जॉन मॉरोसारखे ब्लॉगर्स त्यांच्या ब्लॉगवरुन हजारो डॉलर्स कमवत आहेत. ब्लॉग प्रारंभ करण्यासाठी कला म्हणजे आपल्याला कोणतीही कोडिंग कौशल्ये शिकण्याची आवश्यकता नाही आणि आपण 30 मिनिटांत व्यावसायिक ब्लॉगर बनू शकता. यामध्ये आपण लिहू इच्छित असलेले कोणतेही क्षेत्र आपण निवडू शकता. जसे की चित्रपट, खेळ, आरोग्य किंवा तंत्रज्ञान या गोष्टी असू शकतात. तथापि, आपण विनामूल्य ब्लॉगिंग सुरू करू शकता, परंतु आपल्याला ब्लॉगिंगच्या माध्यमातून पैसे कमवायचे असल्यास, आपल्याला ब्लॉगमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपण १०० डॉलरमध्ये व्यावसायिक ब्लॉग प्रारंभ करू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: screen

घरी राहून करा कोडींगची कामे
कोरोनाच्या संकटानंतर कुशल डेव्हलपर आणि कोडींग करणाऱ्या कामगारांना मोठी मागणी आहे. विशेषत: सॉफ्टवेअर व्हायरसला रोखण्यासाठी कुशल असलेल्यांना मोठी संधी मिळू शकेल. शिवाय व्यवसायाचे भौतिक स्थान बंद करुन इंटरनेटच्या माध्यमाचा प्रभावी वापर करता येऊ शकेल. कोडींग शिकण्याकरिता ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. 

No photo description available.

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात आहेत अनेक संधी 
डिजिटल मार्केटर म्हणून ऑनलाइन उपस्थिती आणि विक्री वाढवू शकत असल्यामुळे, लॉकडाउननंतर डिजिटल विक्रेत्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ज्या कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा काही भाग ऑनलाईन चालवित आहेत, त्या यापुढे संपूर्ण व्यवसाय ऑनलाइनच्या माध्यमातून करण्याचा विचार करत आहेत. यासाठी त्यांना एका व्यक्तीची आवश्यकता असेल, जे वेबसाइट सेट करू शकतील, एसईओ करू शकतील आणि सोशल मीडिया, जाहिरात इत्यादी कामे हाताळू शकतील. 

स्वत:च व्हा विक्रेते 
कोरोनाच्या काळानंतर उत्पादक त्यांचे उत्पादन आणि सेवा यांची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्रेते शोधतील. त्यामुळे आपणास आपले संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी वेळ खर्च करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून विक्रेता म्हणून आपण एखादा करार करू शकाल.  

Image may contain: laptop, coffee cup, drink and phone

बना कॉपीराइटर 
स्टार्टअप किंवा कोणत्याही ब्रँडमध्ये वस्तू, सेवा यांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी या कौशल्याची अधिक गरज भासते. एक चांगला कॉपीराइटर मर्यादित वेळेत चांगले उत्पन्न कमावू शकतो. ज्या कंपन्या जाहिराती करतात, त्यांना कॉपीरायटरची आवश्यकता असते.

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Definitely learn these 5 skills during lockdown period