Delivery Boy : डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काय करावं लागतं; किती असतो पगार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delivery Boy

Delivery Boy: डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काय करावं लागतं; किती असतो पगार!

Delivery Boy Jobs : कडक उन्हात तूम्ही एसी कारमधून जेव्हा तूम्ही प्रवास करत असता. तेव्हा तळपत्या उन्हात कोणाला तरी जेवण पोहोचवण्यासाठी धडपड करणारा डिलिव्हरी बॉय तूम्हाला दिसतो. तेव्हा त्याची दया येते आणि किती रूपये पगार असेल त्याला असा प्रश्न आपसुकच आपल्याला पडतो.

जेव्हा एखादा नवा व्यवसाय बाजारात येतो. तेव्हा नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात. आजकाल करिअर ऑप्शन म्हणून डिलिव्हरी करणाऱ्या या नव्या क्षेत्राकडे पाहिले जात आहे. यामूळेच खाद्य पदार्थ ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

आज जर तुम्ही मेट्रो शहरात रहात असाल तर तुम्ही कित्येक दिवस घराबाहेर न पडता सहज राहू शकतात इतके ऑनलाईन ऑर्डर करण्याचे पर्याय दिवसागणिक आपल्यासमोर येत आहेत.

आज ‘स्विगी’ या जपानी कंपनीचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी इतकी कमाई करतो हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. नोकरी करतांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या ‘स्विगी’च्या ‘डिलिव्हरी बॉय’ला सुद्धा उपलब्ध असतात आणि म्हणूनच आज हजारो सुशिक्षित लोक पूर्ण वेळ किंवा ‘पार्ट टाईम’ या ‘स्विगी’ सोबत जोडले जात आहेत.

आज करिअरच्या ऑप्शनच्या दृष्टीने याची माहिती पाहुयात. या क्षेत्रात जाण्यासाठी किती पात्रता आहे? किती पगार आहे, तसेच कामाचे स्वरूप काय आहे हे पाहुयात.

शिक्षणाची अट

कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळवण्यासाठी आधी 10वी किंवा 12वी पास असावे लागता.तसेच तूमच्याकडे टु व्हिलर असायला हवी,अशी अट या कंपनीची असते.  

पात्रता

  • उमेदवार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.

  • त्याच्याकडे स्मार्टफोन असावा, स्मार्ट फोन कसा चालवायचा हे माहित असावे.

  • उमेदवाराकडे स्वत:ची बाईक असावी

  • बाईक किंवा बाईककडे सर्व कागदपत्रे असावीत.

  • ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे.

  • आधार कार्ड/पॅन कार्ड आणि बँक खाते असावे.

असे करा अप्लाय

तूमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता.

तुम्ही तुमच्या शहरा जवळच्या ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन नोकरीबद्दल बोलू शकता किंवा ई-कॉमर्स कंपनीच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

जॉबसाठी अवश्यक कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवे

  • आधार कार्ड/पॅन कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.

कसे बनाल डिलिव्हरी बॉय

  • डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी, पहिली 10वी किंवा 12वी उत्तीर्ण व्हा.

  • बाईक चालवायला शिका आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा.

  • ई-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयच्या जॉबसाठी अर्ज करा.

  • संबंधित कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन अर्ज करा.

  • तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

  • प्रत्येक शहरात/नगरात फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपनीचे कार्यालय किंवा केंद्र आहे.

  • तुमच्या शहरातील जवळच्या ई-कॉमर्स केंद्रावर जाऊन नोकरीसाठी अर्ज करा.

  • तुमच्याकडे डिलिव्हरी व्यक्तीची सर्व कौशल्ये असतील आणि डिलिव्हरी बॉयची जागा रिक्त असेल, तर तुम्हाला नोकरी मिळेल.

यासाठी कोणत्याही प्रकारची परिक्षा घेतली जात नाही. फक्त तुमच्या व्यक्तीमत्वाची चाचणी घेतली जाईल.

तूमच्याकडे गाडी नसेल तर...

तुमच्याकडे स्वतःची गाडी असावी आणि तुमच्याकडे दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असावा या गोष्टी इतर आवश्यक पात्रता कंपनीने ठेवली आहे. स्वतःची गाडी नसेल, पण दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असेल तर स्विगी तुमच्यासाठी बाईक खरेदी करते आणि तुम्हाला मासिक हफ्त्याने उपलब्ध करून देते.

डिलिव्हरी बॉयला किती पगार असतो

कंपनी डिलिव्हरी बॉयला दरमहा 10,000 ते 15,000 रुपये वेतन देते. प्रत्येक पदार्थाच्या डिलिव्हरीसाठी प्रति किलोमिटर 5 ते 7 रुपये मिळतात. त्यामूळे महिन्यात तूम्ही जितकी फुड डिलिव्हरी कराल तितके रूपये तूम्हाला मिळतात. त्यामूळे पगाराचा आकडा स्थीर नसतो. वेळेनुसार ‘डिलिव्हरी बॉय’ला पैसे देण्याचं ठरवलं असेल तर ती रक्कम १ रुपये प्रति मिनिट अशी ठरवली जाते.

पार्ट टाईम कामासाठी किती मिळतात

डिलिव्हरी बॉय हा जॉब तूम्ही पार्ट टाईम कामासाठी पाहत असाल. तरी हा पर्याय तूमच्या फायद्याचाच आहे. प्रत्येक दिवशी ८ ते १० डिलिव्हरीची संधी देऊन त्यांचं रोजचं उत्पन्न हे कमीत कमी ८४० रुपये असेल याची स्विगी नेहमी काळजी घेत असते.

पार्ट टाईमसाठी ही रक्कम प्रति दिवस ४२० रुपये इतकी ठरवलेली आहे. प्रत्येक दिवशी ८ ते १० डिलिव्हरीची संधी देऊन त्यांचं रोजचं उत्पन्न हे कमीत कमी ८४० रुपये असेल याची स्विगी नेहमी काळजी घेत असते. पार्ट टाईम साठी ही रक्कम प्रति दिवस ४२० रुपये इतकी ठरवलेली आहे.

पेट्रोल कंपनी देते का?

डिलिव्हरी बॉयसाठी पेट्रोलचा खर्च वेगळा दिला जातो का. असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. तर त्याचे उत्तर असे आहे की, कंपनी फकत पगार देते. पेट्रोलचा खर्च तुम्हाला तुमच्या पगारातून द्यावा लागतो.