Dell Layoff : मंदीचं मळभ अधिक गडद! डेल देणार 6,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dell Technologies

Dell Layoff : मंदीचं मळभ अधिक गडद! डेल देणार 6,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ

Dell Technologies Layoff : जागतिक मंदीचं मळभ अधिक गडद होताना दिसून येत असून, गुगलसह अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कर्मचारी कपातीच्या घोषणेमुळे करोडो लोकांच्या मनात भीती असून, दिग्गज कंपन्यांच्या यादीत आता डेल कंपनीचादेखील समावेश झाला आहे.

डेलकडून जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीने केली आहे. यामुळे जवळपास ६,६०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

कंपनी बाजारातील परिस्थिती अनुभवत असून, दिवसेंदिवस यात अधिक अनिश्चितता येत असल्याचे कंपनीचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 5% कर्मचारी कपात करणार आहे. यापूर्वी कंपनीने २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. 

IBM कॉर्पकडून कर्मचारी कपात

काही दिवसांपूर्वीच तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी IBM कॉर्पने 3,900 कर्मचारी कपात करणार असल्याची घोषणा केली होती.

चौथ्या तिमाहीत महसूल आणि वार्षिक रोखीचे लक्ष्य गाठता न आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने नमुद केले आहे.

SAP कडूनही मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा

IBM शिवाय जर्मन सॉफ्टवेअर फर्म SAP ने गुरुवारी एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३००० कर्मचारी किंवा २.५ टक्के कर्मचारी कमी करणार असल्याचे सांगितले आहे.

जर्मनीमध्ये SAP चे मुख्यालय असून, SAP ने चौथ्या तिमाहीत क्लाउड बिझनेसच्या महसुलात 30 टक्क्यांची वाढ नोंदवल्यानंतर ही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याशिवाय SAP ने Qualtrics मधील आपला हिस्सा विकण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे.

जगभरातील मंदीच्या भीतीने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय अनेक स्टार्टअप्सनी खर्चात कपात आणि नफा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.

टॅग्स :jobRecession