संवाद : सर्वांत जुने ट्विट

सम्राट अशोक हे कदाचित ‘जनसंवादाचे जनक’ होते. कारण त्यांनी त्यांच्या साम्राज्यातील दगडी शिलालेखांच्या माध्यमातून त्यांचे क्रांतिकारी विचार जगभर पोचवले.
twitter
twittersakal

- धीरज सिंह

सम्राट अशोक हे कदाचित ‘जनसंवादाचे जनक’ होते. कारण त्यांनी त्यांच्या साम्राज्यातील दगडी शिलालेखांच्या माध्यमातून त्यांचे क्रांतिकारी विचार जगभर पोचवले. दगडी शिलालेख आजही अस्तित्वात आहेत आणि ते सम्राट अशोक यांच्या कारभाराच्या शैलीबद्दलचे अनेक पैलू आणि अगदी त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्याद्वारे ओळखले जातात. उदाहरणार्थ, ते स्वत:ला ‘देवांचा प्रिय’ किंवा ‘देवांप्रिया’ मानत होते. जो आजच्या काळात किंवा युगात खूप आत्म-प्रेमाने भरलेला दिसतो. अर्थात, अशोक हे त्यांच्याआधी आलेल्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करत होते.

अत्यंत निकडीच्या वेळीच सर्वांत प्रभावी संवादकाची आवश्यकता असते. बौद्ध धर्माची सर्वांना ओळख व्हावी आणि तो जीवनाचा नवीन मार्ग म्हणून स्वीकारला जावा, अशी सम्राट अशोक यांची महत्त्वाची निकड होती. कलिंग युद्धाने अशोक यांच्या जीवनात समग्र परिवर्तन घडवून आणले, हे आपण सर्वजण जाणतोच. जो सम्राट आपल्या राज्यात कोणत्याही मूल्याचे विधिनिषेध बाळगण्यास तयार नव्हता, त्याचबरोबर शेजारी राज्यांवर आक्रमण करायलाही मागेपुढे पाहत नव्हता, त्या सम्राटामध्ये आमूलाग्र बदल झाला. हा बदल केवळ मानवतेपुरता मर्यादित नव्हता, तर सर्व सजीवांबद्दल करुणा बाळगू लागला.

आधुनिक लोकशाहीमध्येही अशा प्रकारचा तातडीचा संवाद आपण पाहतो. सर्वसामान्य जनतेतून निवडून येऊ पाहणारे पक्ष आणि लोकप्रतिनिधी जनतेला आकर्षित करणाची आश्वासने देतात. त्यासाठीचे जाहीरनामाही तयार करतात. प्रत्येकजण त्याची वाट पाहत असल्याचे भासवून त्याला क्रांतिकारक बदल असल्याचे त्याद्वारे सांगितले जाते. अनेकांना आश्चर्य वाटते, की काही शब्द लोकांचे हृदय आणि मन कसे कायमचे बदलू शकतात. दगडावर किंवा कागदावर लिहिलेले किंवा डिजिटल जागेत बोललेले किंवा लिहिलेले आणि बोललेले शब्द लोकांची विचार करण्याची पद्धत कशी बदलू शकतात? मात्र, अशोकच्या उदाहरणावरून ते शक्य आहे, हे आपण पाहतो. अशोकाची युद्धे जे साध्य करण्यात अयशस्वी ठरली, ते त्यांच्या शीलालेखांमध्ये लिहिलेल्या वचनांमधून अधिक परिणामकारकतेने पोचले.

गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी उभारलेले शीलालेख सर्वांना वाचायचे होते. सम्राट अशोक लाखो फॉलोअर्स असलेला प्राचीन जगतातील ‘एक हाती ट्विटर मॅन’ होता!

अशोक संज्ञापनाचा प्रवर्तक होता. सम्राट अशोकासारखे प्रभावी व्यकित्मत्त्व जगाने आजपर्यंत पाहिलेले नाही व त्यांचा प्रभाव आजही टिकून आहे. हीच खरी संवादाची शक्ती आहे. इंटरनेट किंवा टीव्ही आणि रेडिओ, छपाई यंत्रणेचा शोध लागण्यापूर्वी आम्हाला सम्राट अशोकाकडून ते शिकवले गेले होते.

(लेखक स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन आणि द आयडिया लॅब, एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com