esakal | थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अभियांत्रिकी (Engineering) किंवा तंत्रज्ञान (Technology) अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीयवर्ष पदविका प्रवेशासाठीचे (Admission) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गुणवत्तायादीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ४ ऑगस्ट असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Direct Second Year Engineering Admission Process Started)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीची ही प्रवेश प्रक्रिया राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांसाठी राबवली जात आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रत आणि पडताळणीची प्रक्रिया याद्वारे पार पडणार आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्रता -

- विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी

- दहावी नंतर आयटीआयमधील दोन वर्षाचा अभ्यासक्रम

नोंदणीचे संकेतस्थळ -

https://dsd21.dtemaharashtra.gov.in/dsd21/

अशी करा प्रवेश नोंदणी -

- उमेदवाराने वेळापत्रकानुसार वरील संकेतस्थळावर अर्ज सादर करावे

- ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे, हे शुल्क परत मिळणार नाही

- सीबीएससी किंवा आयसीएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतरच संबंधित तपशील भरावा

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक -

१) नोंदणी आणि पडताळणी करण्याची अंतिम तारीख - ४ ऑगस्ट

२) तात्पुरती गुणवत्तायादी प्रसिद्ध करणे - ७ ऑगस्ट

३) गुणवत्ता यादीसंदर्भात तक्रार असल्यास सादर करणे - १० ऑगस्ट पर्यंत

४) राज्य किंवा अखिल भारतीय स्तरावरील अंतिम गुणवत्ता यादी - १२ ऑगस्ट

loading image