टेक करिअर : वाणिज्य शाखेतील पर्याय

दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या पदांवर वाणिज्य शाखेतील विविध विषयांचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत.
Commerce Option
Commerce OptionSakal
Summary

दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या पदांवर वाणिज्य शाखेतील विविध विषयांचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत.

दैनंदिन जीवनात अनेक महत्त्वाच्या पदांवर वाणिज्य शाखेतील विविध विषयांचा उपयोग करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. याच क्षेत्रातील उपयोगितेच्या कौशल्यांना अनेक पूरक अभ्यासक्रमांची साथ ही करिअर दृष्टीने तेवढीच महत्त्वाची आहे.

ई-कॉमर्स, मोबाईल कॉमर्स, बँकिंग टेक्नॉलॉजी, सॅप बेसिस, सॅप फंक्शनल, सॅप टेक्निकल आदींसह एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग, आदी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शाखांचा या वाणिज्य शाखेत वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, ई अकाउंटिंग, डिजिटल मार्केटिंग, आणि डेटा मॅनेजमेंट, या पूरक शाखा कौशल्यांचा विकास करिअर मॅपिंगसाठी गरजेचा आहे.

गुगल अॅडवर्ड, गुगल अॅडवर्ड एक्स्प्रेस अशासारख्या अनेक डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा दैनंदिन वापर करण्यासाठी विशिष्ट कौशल्ये प्राप्त करण्याची क्षमता नवयुवकांमध्ये असणे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे बनले आहे. सर्च इंजिन मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, एसएमएस मार्केटिंग, आदी अनेक प्रकार विशिष्ट कौशल्यांशिवाय सहज शक्य नसल्याने या क्षेत्रात अद्ययावत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, सर्टिफाइड फायनान्शियल अॅनालायसिस्ट, कॉस्ट अकाउंट आदी क्षेत्रातल्या अनेक संधी या शाखेतील युवकांना उपलब्ध आहेत. याच क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे ‘इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट’ सारखी शाखा नव्याने निर्मित झाली असून या शाखेतील कौशल्यधारकांची सध्या मोठ्या प्रमाणात निकड भासत आहे.

ई-कॉमर्स क्षेत्राबरोबरच ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग, ऑल टाइम मनी फॅसिलिटी, ऑटोमॅटिक मनी ट्रान्स्फर आदी पूरक कार्यांसाठी त्या त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशनची पात्रता आणि कौशल्य प्राप्त युवकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

वाणिज्य क्षेत्रातील करिअर मॅपिंगसाठी ई-कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ऑनलाइन सेल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, डेटा कलेक्शन, डेटा अॅनालायटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिटेल ईसेल आदी विविध कौशल्यांची माहिती करिअर मॅपिंगसाठी उपयुक्त ठरते आहे.

फिनटेक कंपन्या, ऑनलाइन सर्विसेस साठी फ्रंटएड आणि बॅकेंड तंत्रज्ञान पुरवणाऱ्या आणि वाणिज्य शाखेचे माहिती एकत्रित असणाऱ्या प्रशिक्षित युवकांची मोठ्या प्रमाणात सध्या गरज असल्याने त्या त्या क्षेत्रातील कौशल्यांचे करिअर मॅपिंग महत्त्वाचे ठरते आहे. वाणिज्य शाखेला पूरक अशा गुणवत्तेच्या अभ्यासक्रमासाठी सर्टिफाइड क्वॉलिटी ऑडिटर, सर्टिफाइड क्वॉलिटी मॅनेजर, इन्फॉर्मेशन सिस्टीम क्वॉलिटी ऑडिटर आदी प्रकारची कौशल्ये देणारे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.

वाणिज्य शाखेच्या सोबतच्या करिअर मॅपमध्ये काही प्रातिनिधिक कौशल्ये तसेच काही निवडक संधींबाबतच करिअर मॅप तयार केला आहे. प्रत्येक विषयाच्या अन्य अनेक पूरक कौशल्यानुसार विविध करिअर मॅप उज्ज्वल भवितव्यासाठी करणे सहज शक्य आहे.

वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या युपीएससी आणि एमपीएससी यांसह बँकिंग रिक्रुटमेंट बोर्डाच्या अनेक स्पर्धा परीक्षांना हे विद्यार्थी पात्रही होत असल्याने त्यानुसार करिअर नियोजन करणे ही युवकांना सहज शक्य आहे.

करिअर मॅप - वाणिज्य (कॉमर्स) शाखा

कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम

१) व्यवस्थापन पदविका फायनान्शिअल मॅनेजमेंट, बँकिंग मॅनेजमेंट

२) माहिती तंत्रज्ञान कौशल्य (आयटी स्किल्स)

३) इन्फर्मेशन सिस्टीम ऑडिट

४) परदेशी भाषा

५) इन्शुरन्स प्रशिक्षण

करिअरविषयक बहुविध पर्याय

१) इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर पॅकेज, अकौंटिंग पॅकेज

२) डिप्लोमा इन इंटरनेट बँकिंग

३) डिप्लोमा इन सॅप

४) सी. ए. (चार्टंर्ड अकौंटंट)

५) आय. सी. डब्ल्यू. ए.

६) सी. एस. (कंपनी सेक्रेटरी)

स्पर्धा परीक्षा

  • एम. पी. एस. सी., यू. पी. एस. सी.

  • बँकिंग रिक्रुटमेंट

  • अन्य स्पर्धा परीक्षा

विविध पदे

  • अकौंटंट, व्यवस्थापक, डेटा ॲनासायटिक्स, मार्केटिंग मॅनेजर आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com