वेध भविष्याचा : मटेरिअल सायन्स आणि इंजिनिअरिंग

आधुनिक फिल्टर, संवेदनशील उपकरणे या सर्वच बाबतीत मटेरिअल हाच कळीचा मुद्दा बनला आहे.
material science and engineering
material science and engineeringsakal
Summary

आधुनिक फिल्टर, संवेदनशील उपकरणे या सर्वच बाबतीत मटेरिअल हाच कळीचा मुद्दा बनला आहे.

- डॉ. मल्हारी कुलकर्णी / प्रा. दत्ता दंडगे

आधुनिक फिल्टर, संवेदनशील उपकरणे या सर्वच बाबतीत मटेरिअल हाच कळीचा मुद्दा बनला आहे. ‘मटेरिअल सायन्स आणि इंजिनिअरिंग’ या अत्याधुनिक ज्ञानशाखेत या सर्व गोष्टींचा शास्त्रशुद्ध विचार कसा करावा हे शिकविले जाते. एखाद्या अॅप्लिकेशनमध्ये कोणता गुणधर्म हवा आहे हे पाहून त्याप्रमाणे मटेरिअलची सूक्ष्म तसेच स्थूल पातळीवर बांधणी करणे हे मोलाचे काम मटेरिअल्स इंजिनिअर करतात. सध्याचे जग मटेरिअल, मटेरिअल डिझाईन, त्याच इंटिग्रेशन, सिम्युलेशन, प्रोसेसिंग याविषयी अत्यंत काटेकोर होत आहे.

पर्यावरणाच्या आणि अर्थकारणाच्या दोन्हीच्या दृष्टीने यावर अधिकाधिक संशोधन आणि सुधारणा होत राहणं ही भविष्याची गरज आहे. त्यासाठी ‘मटेरिअल सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग’ उपयुक्त करते. उत्पादनासाठी मटेरिअलची निवड करण्यापासून त्याच्या प्रोसेसिंगपर्यंत सर्व आवश्यक गोष्टीचा अंतर्भाव या कोर्समध्ये आहे. या अभ्यासक्रमात भविष्यातले पर्याय म्हणून पाहतो अशा पॉलिमर, नॅनो, कॉम्पोझिट आणि बायोमटेरिअल यांच्यावर विशेष भर दिला आहे.

कोविड काळात बहुचर्चित असलेले ‘N95’ नॅनो कोटेड मास्क हे नॅनो मटेरिअलचं ठळक उदाहरण आहे. फक्त हेच नाही, तर शेती, बांधकाम, खाद्य-व्यवसाय, संरक्षण, रोबोटिक्स, केमिकल अशा अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांच्या प्रगतीसाठी मटेरिअल सायन्स काम करत असते. एरोस्पेस किंवा हवाई-वाहतूक क्षेत्रातही सेफ्टी आणि खर्चाच्या दृष्टीने मटेरिअल सायन्सला अधिक महत्त्व दिले जाते. हेच वैविध्य लक्षात घेऊन अभ्यासक्रम बनवताना प्रत्यक्ष इंडस्ट्री ॲप्लिकेशनला जास्त प्राधान्य दिले आहे.

यासोबतच विद्यार्थ्यांना डिझाईन सिंथेसिस म्हणजे एखाद्या उत्पादनाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार एकापेक्षा अधिक मटेरिअलच्या साहाय्याने योग्य पर्याय कसा तयार करता येईल याविषयी मार्गदर्शन मिळेल. त्याचपद्धतीने अशा एखाद्या संरचनेतील मटेरिअलचा परस्परसंबंध, त्यांच प्रत्यक्ष को-वर्किंग, त्याच यश-अपयश अशी संपूर्ण लाइफ सायकल बारकाईने अभ्यासता येईल. हा कोर्स पूर्ण करणाऱ्याला प्रॉडक्शन, मटेरिअल्स डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, ग्लास आणि सिरॅमिक उत्पादने, इंडस्ट्रिअल सोल्यूशन अशा निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक नवीन संधी देशात-परदेशात उपलब्ध होऊ शकतात. केवळ नोकरीच नाही तर उच्चशिक्षण किंवा संशोधन यात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठीही संधी उपलब्ध आहेत.

प्रवेशाविषयी

मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये ‘पीसीएम’ घेऊन जेईई व एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून सरकारी तसेच खासगी महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. मटेरिअल्स सायन्स अँड इंजिनिअरिंग ही शाखा दिवसेंदिवस विकसित होत आहे. या शाखेमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com