विशेष : अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी

आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक अभियांत्रिकी शाखेची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, मागच्या दशकात एका अभियांत्रिकी शाखेमुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले.
Nuclear power and telecommunications engineering
Nuclear power and telecommunications engineeringsakal
Summary

आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक अभियांत्रिकी शाखेची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, मागच्या दशकात एका अभियांत्रिकी शाखेमुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले.

- प्रा. डॉ. शिल्पा मेटकर

आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक अभियांत्रिकी शाखेची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, मागच्या दशकात एका अभियांत्रिकी शाखेमुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाले. ज्या शाखेमुळे संपूर्ण कोरोना महामारीच्या काळात जगाचा कारभार आणि संपर्क चालू राहिला आणि ज्यामुळे अर्थव्यवस्था अगदीच कोलमडली नाही. ज्या अभियांत्रिकी शाखेमुळे संपूर्ण जग जवळ, आले, ज्या अभियांत्रिकी शाखेमुळे संपर्कामध्ये क्रांती झाली आणि प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी आला, ती शाखा म्हणजे अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकी.

महत्त्व इलेक्ट्रॉनिक सर्किटचे

वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन करणे हे अणुविद्युत शाखेचे मूलभूत कार्य आणि संपर्क यंत्रणा निर्माण करणे हे दूरसंचारचे क्षेत्र. मात्र, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या शाखेत विशेष विभाग तयार झाले. ह्या अभियांत्रिकी शाखेने आपल्या घरात प्रवेश केला तो साधारणपणे ऐंशीच्या दशकात, रेडिओच्या माध्यमातून नंतर दूरचित्रवाणी संच आणि आता अगदी गरजेचा झालेला भ्रमणध्वनी. आता रोजच्या जीवनात वापरात असलेल्या प्रत्येक वस्तूंत इलेक्ट्रॉनिक सर्किट असतेच. या सगळ्या उपकरणांच्या आकारामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली ती व्हीएलएसआय (व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन) या तंत्रज्ञानामुळे. त्यातून इलेक्ट्रॉनिक सर्किटचा आकार कमी होत गेला. आता आपण या शाखेतील वेगवेगळ्या विषयातील संधींचा आढावा घेऊयात.

सेमीकंडक्टर ते इंटरनेट ऑफ थिंग्ज

डिजिटल युगात अग्रेसर राहावयाचे असल्यास सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सेमीकंडक्टर चिप मॅन्युफॅक्चरिंग. स्मार्ट फोन, हेल्थ वियरेबल्स, वाहने, लॅपटॉप्स, दूरदर्शन संच, मायक्रोव्हेवस, एअर कंडिशनर्स या आणि अशा अनेक क्षेत्रांसाठी सेमीकंडक्टर चिप अत्यंत महत्त्वाची आहे. या क्षेत्रात भारत अजून खूप मागे आहे आणि अभियंत्याना या क्षेत्रात येणाऱ्या काळात अनेक संधी उपलब्ध होतील. दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे संदेश आणि प्रतिमा प्रक्रियन. सुरक्षा, टेहळणी, वैद्यकीय निदान आणि उपचार, इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी. यामध्ये संदेश आणि प्रतिमा प्रकिया आता ठळकपणे वापरले जात आहे. विशेषतः प्रतिमा आणि संदेश यातील अडथळे दूर करून, कमीत कमी वेळेत आणि कमी डेटा वापरून त्याचे वाहन करण्यासाठी, नाविन्यपूर्ण अल्गोरिथम लिहिणे यामध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याचा दैनंदिन व्यवहारामध्ये खूप उपयोग होत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स या संज्ञेखाली वापरण्यात येणारे सेन्सरस, सॉफ्टवेअर्स यांना काम करण्यासाठी आधारभूत इलेक्ट्रॉनिक्स सर्किटची आवशक्यता असते.

आयओटी ने जोडल्या गेलेले सगळे उपकरणे ह्या माहितीजाल वापरून डेटा चे आदान प्रदान करतात. ह्याचा उपयोग स्मार्ट मॅन्यूफॅक्टरिंग, स्मार्ट ग्रीडस, स्मार्ट डिजिटल सप्लाय चेन्स, स्मार्ट सिटीजमध्ये होतोय. कृत्रिम बुद्धिमत्तेने आता सर्वच क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. कुठलेही उपकरण वा उत्पादन आता स्मार्ट असल्याशिवाय त्याकडे ग्राहकांचा कल दिसत नाही. अगदी घरातला मिक्सर ग्राइंडर, मायक्रोवेव्ह सुद्धा स्मार्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनुपालन करताना लागणारे सगळे हार्डवेअर हे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात. वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी वेगवेगळे सर्किट बनविण्यासाठी उत्तम अभियंत्यांची गरज आहे. मायक्रो इलेकट्रोमेकॅनिकल सिस्टिम्समध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटचा समावेश होतो.

महत्त्व रोबोंचे

रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे पुढे येणारे क्षेत्र आहे. रोबोट्समध्ये अनेक सेन्सर्स वापरले जातात. उत्पादन प्रक्रियेमध्ये आता अनेक रोबोट्स एकत्रितपणे वापरले जातात, ज्याला रोबोट स्वार्म असे संबोधतात. रोबोट्सच्या संचलनासाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्रामिंगची गरज आहे, ह्या क्षेत्रातसुद्धा आता खूप संधी उपलब्ध आहोत आहेत. मानवी चुका टाळून, कमीत कमी वेळात, चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी ऑटोमेशनचा उपयोग सुरू झाला, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, जसे की प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर हा ऑटोमेशनचा पाया आहे. प्रत्येक वस्तू/उत्पादन किंवा उपकरण यांना स्मार्ट बनविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अत्यंत गरजेचे आहे. दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीने जग अगदी जवळ आले. माहितीचे मायाजाल म्हणजेच इंटरनेट अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोचले, पण अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. आता 5G येऊ घातले आहे, त्यातही दूरसंचार अभियंत्यांना अनेक संधी येत्या काळात उपलब्ध होतील. ज्या विद्यार्थ्यांना स्मार्ट वस्तू/उत्पादन निर्मितीमध्ये आवड आणि कुतूहल आहे त्यांनी अणुविद्युत आणि दूरसंचार शाखा निवडावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com