करिअर अपडेट : भटकंतीला करिअरची जोड

प्रवास हा आपल्या जीवनातील अविभाज्य अंग/घटक आहे. प्रवास हा एक उत्तम शिक्षक आहे व ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे.
Tourism Career
Tourism CareerSakal
Summary

प्रवास हा आपल्या जीवनातील अविभाज्य अंग/घटक आहे. प्रवास हा एक उत्तम शिक्षक आहे व ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे.

- डॉ. वंदना जोशी

प्रवास हा आपल्या जीवनातील अविभाज्य अंग/घटक आहे. प्रवास हा एक उत्तम शिक्षक आहे व ते आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप उपयुक्त आहे. ही प्रवासाची आवडीकडे आपण एक करिअर म्हणूनही आता उपलब्ध आहे.

प्रवास हा व्यवसाय, आरोग्यासाठी केला जातो त्याचबरोबर फुरसतीच्या वेळात अनेक अनुभव घेण्यासाठी पर्यटक वेगवेगळ्या देशविदेशातील पर्यटन स्थळांना भेट देतो. त्यामध्ये मुख्यत्वे वारसा पर्यटन, कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन इत्यादीचा समावेश आहे.

पर्यटन क्षेत्रामुळे ट्रॅव्हल कंपन्या, हॉटेल, कार रेंटल कंपन्या, विमान कंपन्या, टूर ऑपरेटर, टूरिस्ट गाइड व टूर इस्कॉट इत्यादीचा समावेश असल्यामुळे हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. पर्यटन व्यवसायाचा सेवा क्षेत्रात समावेश आहे.

या आगामी व नावीन्यपूर्ण क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकार प्रवेश घेता येतो. त्यामध्ये दहावी, बारावीनंतर व पदवीनंतरचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सुरुवात आधी केल्यास या क्षेत्रातील माहिती व अनुभव लोकांशी बोलल्यास हे क्षेत्र करिअरसाठी मोलाचे आहे याची माहिती मिळेल.

पर्यटनाचे महत्त्व ओळखून नववी दहावीच्या भूगोलाच्या विषयामध्ये पर्यटनाची क्षेत्राशी ओळख करण्याविषयी पाठ्याचा समावेश केला आहे. विविध प्रसार माध्यमेही पर्यटनाचे महत्त्व जाणून देत आहेत. पालकही सुट्टयांमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत दरवर्षी देश विदेशातील सहलीसाठी जातात. त्या सहली फक्त फुरसतीसाठी नसून त्यामध्ये ही करिअर करता येते हे पालकाने विचारात घेण्यासारखे आहे व नेहमीच्या करिअर पर्यायाऐवजी पर्यटनाचा एक पर्याय म्हणून विचार करता येतो.

दहावीनंतर महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे पर्यटन व पदविका अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवीत आहे. हा अभ्यासक्रम खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

  • महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे.

  • शासकीय तंत्रनिकेतन. ठाणे.

  • शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर.

त्या व्यतिरिक्त काही विद्यापीठात व महाविद्यालयात पर्यटन संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. जसे की मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन, एम.बी.ए. इन टुरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम आदी. यामध्ये बारावी तसेच पदवीनंतर प्रवेश घेऊन पर्यटन क्षेत्रात करिअर करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com