करिअर अपडेट : ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेटर

पर्यटन हा भारतातीलच नव्हे तर जगातील वेगाने वाढणारा उद्योग आहे. प्राचीन काळातील पर्यटन हे समुदायाने केले जाणारे होते.
Travels Agency
Travels AgencySakal
Summary

पर्यटन हा भारतातीलच नव्हे तर जगातील वेगाने वाढणारा उद्योग आहे. प्राचीन काळातील पर्यटन हे समुदायाने केले जाणारे होते.

- डॉ. वंदना जोशी

पर्यटन हा भारतातीलच नव्हे तर जगातील वेगाने वाढणारा उद्योग आहे. प्राचीन काळातील पर्यटन हे समुदायाने केले जाणारे होते. परंतु, त्यामागील उद्देश वेगळा होता. तसेच, त्याकाळी पर्यटनाला आवश्यक सोयी सुविधांचा विकास झाला नव्हता. आताच्या पर्यटनात विविध स्थळांचा आनंद घेणे, तेथे आराम करणे, तेथील संस्कृतीची माहिती घेणे त्याचबरोबर मानसिक समाधानाचा आनंद घेणे आदी गोष्टींचा यात समावेश आहे. थॉमस कूकने १८४१मध्ये युरोपात आयोजित प्रवासाचा पाय रोवला आणि तेथूनच ट्रॅव्हल एजन्सीला सुरुवात झाली.

पर्यटनक्षेत्रात ट्रॅव्हल एजंट व टूर ऑपरेटर हे पर्यटकांसाठी विविध घटकांचा व बाबींचा पुरवठा करतात. विमानाचे तिकीट बुक करणे, हॉटेल बुकिंग करणे तसेच देश विदेशातील विविध पर्यटनस्थळांच्या वैयक्तिक व समूह सहली आयोजित करणे ही सगळी कामे ट्रॅव्हल एजंट आणि टूर ऑपरेटर यांच्यामार्फत केले जाते. हे दोघेही पर्यटनासाठीचे अत्यावश्यक माध्यम आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर, उत्साहपूर्वक, आनंददायी व वाजवी खर्चात व्हावा यांचे नियोजन करण्याची जबाबदारी यांच्यामार्फत पार पाडली आहे. भारतात २०२०मध्ये साधारण अडीच लाखांपर्यंत लहान मोठ्या ट्रॅव्हल एजन्सीज होत्या. सध्या कोरोना या साथीच्या आजारानंतर पर्यटनावरील निर्बंध दूर होत असल्याने पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत. परिणामी, या क्षेत्रात करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. पर्यटन क्षेत्राला सर्वात जास्त मनुष्यबळाची गरज आहे. हे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी विविध स्तरांवर वेगवेगळ्या मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पर्यटकांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सी व टूर ऑपरेटर यात सर्वांत जास्त करिअरच्या संधी आहेत. या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी, पुणे व शासकीय तंत्रनिकेतन ठाणे आणि नागपूर येथे उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम केल्यास किंवा इतर कोणताही पर्यटनाशी निगडित अभ्यासक्रम केल्यास ट्रॅव्हल एजन्सीमध्ये करिअर करता येते.

ट्रॅव्हल एजन्सीमध्ये प्रवास समुपदेशक, ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजर, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल प्लॅनर, याचबरोबर देशविदेशांतील सहलींसाठी ट्रॅव्हल कन्सल्टन्ट म्हणून काम करता येते. याव्यतिरिक्त रिझर्व्हेशन विभाग, सेल्स अँड मार्केटिंग विभाग, डॉक्युमेंटेशन विभाग तसेच विदेशी सहलींसाठी व्हिसा व इतर कागदपत्रे तयार करण्यासाठी मुबलक मनुष्यबळ आवश्यक असलेल्या विभागातही काम करता येते.

या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये...

  • उत्तम संभाषण कौशल्य. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या सहलीची संपूर्ण माहिती देऊन सहलीचे आयोजन करता येईल.

  • पर्यटनाची आवड आणि उत्सुकता

  • चालू घडामोडीचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटनाचे निर्बंध, देशविदेशातील आर्थिक व राजकीय परिस्थिती, पर्यटनसाठीचा उत्तम कालावधी तेथील हवामानाबद्दलची माहिती, करन्सी रेट इत्यादीबद्दलची माहिती.

  • संगणकाचे ज्ञान - तिकीट बुकिंग करण्यासाठी इतर सगळ्या सुविधांचे आरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे.

  • भूगोल व इतिहासाचे ज्ञान

  • इंटर पर्सनल स्किल्स

  • कस्टमर सर्व्हिस

  • संघटन कौशल्ये

  • प्रॉडक्ट नॉलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com