दिशा उद्याची : पर्यटन क्षेत्रातील भरारी

पर्यटन म्हणजे देश-विदेशातील प्रख्यात पर्यटनस्थळांसाठी केलेला प्रवास. प्रत्येकाला अशा प्रवासाला जाण्याची आवड असते.
Tourism
TourismSakal
Summary

पर्यटन म्हणजे देश-विदेशातील प्रख्यात पर्यटनस्थळांसाठी केलेला प्रवास. प्रत्येकाला अशा प्रवासाला जाण्याची आवड असते.

- डॉ. वंदना जोशी

पर्यटन म्हणजे देश-विदेशातील प्रख्यात पर्यटनस्थळांसाठी केलेला प्रवास. प्रत्येकाला अशा प्रवासाला जाण्याची आवड असते. पर्यटकांच्या प्रवासासाठीची जबाबदारी ट्रॅव्हल कंपन्यांवर असते. पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे (निर्माण करणारे) क्षेत्र आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या मते जगभरात दर १० व्यक्तींमागे १ व्यक्ती प्रवास किंवा अप्रत्यक्षरीत्या पर्यटन क्षेत्रात काम करीत आहे व यावरून पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या किंवा करिअरच्या संधींबाबतचा अंदाज येऊ शकतो.

कोरोना महामारीनंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात खुले होत आहे. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) च्या जागतिक पर्यटन बॅरोमीटरनुसार २०२२च्या पहिल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये २०२० व २०२१ पेक्षा १८२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

सतत वाढत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्राचे महत्त्व महाराष्ट्र राज्याने आधीच जाणले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्‍नॉलॉजी, पुणे (जी महाराष्ट्र शासनाची शासकीय स्वायत्त संस्था आहे.) येथे डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा पदविका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाचा दहावीनंतरच्या विविध तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे व त्याची प्रवेश प्रक्रियाही एकत्र असते.

डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून, तो सहा सत्रांमध्ये विभागला गेला आहे. सहावे सत्र हे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी राखीव ठेवलेले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल कंपनीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे त्यांना पर्यटनाशी संबंधित घडामोडींचे ज्ञान व मार्गदर्शन मिळते व त्याचबरोबर ते प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभवही मिळतो. हे त्याच्या पर्यटन क्षेत्रातील करिअरचा पाया असून, ते अत्यंत मोलाचे आहे.

या अभ्यासक्रमात भारत व आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळे, भारतीय संस्कृती, ट्रॅव्हल एजन्सी मॅनेजमेंट, ट्रॅव्हल डॉक्युमेंटेशन, व्हिसा, टूर प्लॅनिंग, ॲडव्हेंचर टुरिझम इत्यादी मुख्य विषयांसोबत संभाषण, व्यावसायिक कौशल्य, ग्राहक सेवा या विषयांचाही समावेश आहे. हे विषय पर्यटन हे सेवाक्षेत्र असल्यामुळे आवश्‍यक आहेत. डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या खूप संधी आहेत. ट्रॅव्हल कंपनी, विमान कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, टूर गाइड व टूर एस्कॉट, हॉटेलमध्ये ट्रॅव्हल डेस्क, ॲडव्हेंचर टूर कंपन्या, ट्रॅव्हल रायटर, ट्रॅव्हल फोटोग्राफर यांच्याबरोबर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये इन्फॉर्मेशन असिस्टंटमध्ये करिअर करू शकता. काही वर्षांचा ट्रॅव्हल कंपनीमधील अनुभव घेऊन स्वतःची कंपनी सुरू करून या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देता येते.

दहावीनंतरच्या या नावीन्यपूर्ण करिअरसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठीचे अर्ज online असून polyzz.dte.maharashtra.gov.in/diploma22 या संकेतस्थळावर भरू शकता.

(लेखिका महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्‍नॉलॉजीमध्ये टुरिझम विभागाच्या समन्वयक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com