कौशल्यांची उजळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Schools in Kolhapur district have preserved Urdu language education

उच्च पगार आणि नोकरीच्या अधिक सुरक्षिततेसह उच्च शिक्षणाचे आर्थिक फायदे

कौशल्यांची उजळणी

-ॲड. प्रवीण निकम

आपण आजपर्यंत परदेशी शिक्षणाचे महत्त्व, परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्याची प्रक्रिया, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक गोष्टी जसे की, स्टेटमेंट ऑफ पर्पज, आवश्यक शैक्षणिक कौशल्ये आणि उच्च शिक्षणातील शैक्षणिक लेखनाचे महत्त्व हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या लेखात आजवर आपण पाहिलेल्या गोष्टीवर एक संक्षिप्त नजर टाकू.

उच्च शिक्षणाचे महत्त्व

आपल्या पहिल्या काही लेखात, आम्ही उच्च शिक्षणाचे महत्त्व आणि ते एखाद्या व्यक्तीच्या करिअरच्या मार्गाला कसे आकार देऊ शकते याबद्दल चर्चा केली. आपण या लेखांमध्ये उच्च शिक्षण आपल्या सर्वांना आपल्या निवडलेल्या करिअर मार्गांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान कसे प्रदान करू शकते यावर आपण बोललो.

याचबरोबर आपण जरासे खोलवर जाऊन पाहिल्यास उच्च शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर विचार प्रगल्भ होण्यासाठी केलेला प्रवास, आकलन क्षमता आणि संवाद यांसारखी कौशल्ये विकसित करण्यासाठी केलेला प्रयत्न असायला हवा. आपण उच्च पगार आणि नोकरीच्या अधिक सुरक्षिततेसह उच्च शिक्षणाचे आर्थिक फायदे यावर देखील चर्चा केली.

स्टेटमेंट ऑफ पर्पज

उच्च शिक्षणाचे महत्त्व समजून घेतल्यानंतर आपण ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ आणि अर्ज प्रक्रियेतील त्याचे महत्त्व यावर चर्चा केली. ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ हे कसे अर्जाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि ते अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक व ते शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पदव्युत्तर शिक्षणासाठी काय भूमिका निभावते हे पहिले. याचबरोबर हे आपण घेतलेले शिक्षण आणि भविष्यात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विषयाची प्रतिकृती असते हे समजून घेतले.

शैक्षणिक कौशल्ये

‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’नंतर आपण शैक्षणिक कौशल्यांबद्दल बोललो. उच्च शिक्षणात यश मिळवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक कौशल्ये आपण आत्मसात करायला हवीत, जसे की ॲकॅडमिक रायटिंग, क्रिटिकल थिंकिंग, वेळ व्यवस्थापनाचे महत्त्व आणि संभाषण कौशल्य यावर सविस्तर चर्चा केली. याचबरोबर परदेशी विद्यापीठांमधील अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती यावरही आपण चर्चा केली.

शैक्षणिक लेखन

शेवटच्या दोन लेखांमध्ये आपण उच्च शिक्षणातील शैक्षणिक लेखनाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर लक्ष केंद्रित केले. शैक्षणिक लिखाण हे लेखनाच्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे, कारण त्यासाठी विचारांची स्पष्टता आवश्यक असते याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. याचबरोबर ‘साहित्यिक चोरी’ काय असते हेही समजून घेतले.

अशाप्रकारे पदवीत्तर शिक्षण घेण्याचे या प्रक्रियेत मागच्या काही लेखांनी आपल्याला काही मूलभूत विषयांची माहिती देण्यासाठी मदत केली. आजवर चर्चिलेल्या गोष्टींचा सारांश या लेखात होता. या पुढच्या लेखांमध्ये आपण परदेशी शिक्षणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे शिफारस पत्र, कोर्सची निवड कशी करावी, विद्यापीठांची निवड कशी करायची याविषयी अधिक जाणून घेऊ. तो पर्यंत आपल्या परदेशी शिक्षण स्वप्न सत्यात साकारण्याच्या आपल्या कल्पनेवर काम करायला चालू करा. आपण भेटत राहू.

टॅग्स :educationCareer