
मागील अर्ध्या दशकामध्ये मूल्यमापनाच्या या मापदंडांमध्ये अनेक बदल
आवश्यक गुण
- अंकित भार्गव
मागील पंधरवड्यामध्ये मी ‘एखाद्या आस्थापनेचे मूल्यमापन कसे करावे’ याविषयी लिहिले होते. या संदर्भात केईएसएए (नॉलेज-ज्ञान, एक्सपिरीयन्स-अनुभव, स्किल्स-कौशल्य, अॅप्टिट्युड-बुद्धिमत्ता आणि अॅटिट्युड-दृष्टिकोन) हे सुपरिचित फ्रेमवर्क असले, तरी मागील अर्ध्या दशकामध्ये मूल्यमापनाच्या या मापदंडांमध्ये अनेक बदल झाले आहेत.
ज्ञान
तथ्ये आणि संकल्पना यांच्या समन्वयातून ज्ञानाची निर्मिती होते. ज्ञानाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराला डिजिटल सेल्स, चॅनेल्स किंवा ई-कॉमर्सची माहिती नसल्यास त्याला यशस्वी होण्यामध्ये अडचणी येतील. एखाद्या उमेदवाराची निवड करताना तो जीवनातील विविध परिस्थितींना कशा प्रकारे सामोरे जातो हा महत्त्वपूर्ण घटक असतो.
एखाद्या विषयातील परिपूर्ण ज्ञानामुळे तुम्ही त्या क्षेत्रामधील तज्ज्ञ होऊ शकता, परंतु अपूर्ण ज्ञानामुळे जोखीम वाढते. सध्याच्या सेवा आणि उत्पादन क्षेत्राला दिशा देणाऱ्या ‘नाविन्यतापूर्ण’ या प्रमुख वैशिष्ट्यांचा ‘क्रॉस अॅप्लिकेशन’ हा महत्त्वपूर्ण पैलू आहे.
अनुभव
आपल्या करिअरमध्ये मार्गक्रमण करत असताना तुम्ही स्वत:मध्ये सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असता. भूतकाळामध्ये मिळालेल्या यशाचा अनुभव त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आत्मविश्वास देत असतो. तसेच, कठीण आणि अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्यासाठी मार्ग दाखवत असतो.
अलीकडच्या काळात झालेला एक मोठा बदल म्हणजे भूतकाळातील केवळ यशच नव्हे, तर अपयश देखील महत्त्वाचे ठरते. आपण काय करावे यापेक्षा काय करू नये, या संदर्भातील उद्योग-व्यवसायांनी निष्कर्षाप्रत येण्याबाबतची समज अधिक प्रगल्भ होत आहे. त्याद्वारेच नाविन्यतापूर्ण कार्याचे बीजारोपण करण्यासाठी अनुकूल भूमी उपलब्ध होते. यश आणि अपयश या दोन्हीमधून काहीतरी बोध प्राप्त करणे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
कौशल्ये
एखाद्या क्षेत्रातील दृश्य आणि मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण आणि सराव म्हणजे कौशल्य होय. ग्रोथ प्लॅनिंग करताना एखाद्या व्यक्तीचे कौशल्य विकसित करता येऊ शकते. त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून वार्षिक महसुलाच्या वाढीतून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकते.
सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. किंवा ‘चर्न रेट’च्या आधारे ज्यांचे मूल्यमापन करता येऊ शकेल. अशा मनुष्यबळ विषयक भागीदाराच्या माध्यमातून हे करता येऊ शकते.
अलीकडील काळामध्ये मूलभूत कौशल्यांच्या व्याख्येमध्ये बदल होत आहे. यामध्ये डिजिटल साक्षरता, समूहात काम करणे, सखोल विचार करणे, समस्यांची उत्तरे शोधणे, एकमेकांशी समन्वय साधणे (विशेषतः: वैविध्यतापूर्ण कार्यक्षेत्र असेल तेव्हा), संशोधन कौशल्ये यांचा समावेश आहे.
संशोधन हे सर्वांत जास्त दुर्लक्षित राहिलेले, मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावण्यासाठी आवश्यक असे साधन आहे. कशा संदर्भातील संशोधन करायचे आहे? कुठे संशोधन करायचे आहे? ही माहिती व्यक्तीने एखाद्या नवीन परिस्थितीला एकट्याने कसे सामोरे जावे हे समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरते.
दृष्टिकोन
एखाद्या गोष्टीबाबत तुमचे मत किंवा भावना म्हणजे दृष्टिकोन. सध्याच्या स्पर्धात्मक आणि आग्रही मत प्रदर्शित करणाऱ्या समाजामध्ये कामाची ठिकाणे देखील चुकीच्या दृष्टिकोनाच्या दुष्परिणामांपासून स्वत:चा बचाव करू शकलेली नाहीत. हक्क गाजवण्याची वृत्ती, सहकाऱ्यांविषयी द्वेषभावना, अहंगंड/न्यूनगंड या भावनांचा तुमच्या उत्पादकतेवर आणि एकूणच करिअर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
आस्थापना आपली कार्यसंस्कृती आणि उमेदवाराचा दृष्टिकोन यांची पडताळणी करून पाहते. खराब झालेले एखादे फळ फळाची पूर्ण पेटी खराब करते, या म्हणीप्रमाणे एक कर्मचारी संपूर्ण आस्थापनेच्या विकास प्रक्रियेत अडथळा आणू शकतो.
बुद्धिमत्ता
नवीन कौशल्ये शिकण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. कोडिंग करणाऱ्यासाठी नवीन कोडिंग लँग्वेज, लॉजिस्टिक्स मॅनेजरसाठी नवीन चॅनेल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजरसाठी नवीन प्रोजेक्ट प्लॅनिंग टूल, शेफसाठी नवीन खाद्यपदार्थ ही काही योग्य बुद्धिमत्तेची आवश्यकता सांगणारी उदाहरणे आहेत.
तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा बेस्ड डिसिजन मेकिंग यांचा प्रभाव असणाऱ्या या गतिमान व्यावसायिक युगामध्ये बुद्धिमत्तेचे महत्त्व केंद्रस्थानी आले आहे. योग्य बुद्धिमत्तेची आवश्यकता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘अनुभवाची’ अनिवार्यता कमी होऊन तो ‘असेल तर अधिक चांगला’ या श्रेणीमध्ये आला आहे.
यातूनच नोकरी गमावण्याचे भय जन्माला येते. तुम्ही ‘केईएसएए’ मॉडेलच्या आधारे नोकरी कशी मिळवली याचा अनुभव मला खालील ई-मेल आयडीवर मला कळवा आणि याच विषयावरील एक बेस्टसेलर पुस्तक प्राप्त करण्याची संधी मिळवा.