अभिनयाचे ग्लॅमरस विश्‍व

अभिनय क्षेत्रात रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करून अभिनेता अथवा अभिनेत्री होऊ शकता.
Education News glamorous world of acting Course for acting to become actor or Actress
Education News glamorous world of acting Course for acting to become actor or Actress sakal
Summary

अभिनय क्षेत्रात रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करून अभिनेता अथवा अभिनेत्री होऊ शकता.

अभिनय क्षेत्राचे आकर्षण

या क्षेत्रातील ग्लॅमरचे आकर्षण सर्वांनाच असतं. अभिनय क्षेत्रात मिळणारा नावलौकिक आणि पैसा यामुळे प्रत्येकजण या क्षेत्राकडे आकर्षित होत असतो. या क्षेत्रातल्या ‘ग्लॅमर’पेक्षा अभिनयाचे ‘ग्रामर’ किती महत्त्वाचे आहे, याचा विचार प्रामुख्याने करावा. अभिनय कलेला स्वत:ची थिअरी, प्रॅक्टिकल्स, गणिताप्रमाणे सूत्र आहेत. म्हणूनच ही कलाही आहे तसेच शास्त्रही. अभिनय कलेच्या माध्यमातून परंतु शास्त्राच्या चौकटीत सादर करायचा असतो. अभिनय ही कला असूनही शास्त्रोक्त पद्धतीने साकारावी लागते. त्यासाठी ही कला शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे, अभिनय क्षेत्रांत आपले नावीन्यपूर्ण, निराळं व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणे आवश्यक असतं.

अनेक बाबी अंगीकारणे गरजेचे

योग्य आहार, योग्य आचार, तंदुरुस्त शरीर, प्रसन्न हास्य, सहकार्याची भावना, एकरूप होऊन निष्ठेने काम करून जिवंत आणि विश्वासार्ह अभिनयाचा आविष्कार प्रकट करणे हीच यशस्वी अभिनेत्याची लक्षणं मानली जातात. हावभाव, वागणूक, हालचाली, आवाज, दृष्टीक्षेप या सर्वांच्या संयमी आणि सखोल अभ्यासातून अभिनय चैतन्य सळसळते.

अभिनय आणि नाट्य प्रशिक्षण

अभिनय करता येण्यासाठी सर्वप्रथम कायिक/आंगिक, वाचक, सात्त्विक, आहार्य अभिनय याविषयी अभ्यास करणं आवश्यक असतं. या विविध प्रकारांतील अभिनयाचा ताळमेळ नवरसातून निर्माण झालेले वैशिष्ठ्यपूर्ण भावदर्शन एखाद्या अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने साकारल्यास तो अभिनय दीर्घकाळासाठी स्मरणीय राहतो. यासाठी हास्यरस, रौद्ररास, बिभत्सरस, वीररस, शृंगाररस, करूणरस, वात्सल्यरस, भक्तिरस, भयानकरस, अशा नवरसांची निर्मिती करण्याचं कसब अंगीकारणे आवश्यक असतं.

या अभ्यासक्रमात अभिनयासाठी आवश्यक ते ग्रामर, संभाषण, सात्त्विक, आहार्य अभिनय, आहार, व्यायाम, पोशाख, मेकअप, लाइट, कॅमेरा, अॅक्शन, कट वगैरे विविध विषयाची थिअरी आणि प्रॅक्टिकल्स घेतली जातात. या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्यांना अभिनय क्षेत्रातील नामवंत कलावंतांना भेटण्याची तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध असते.

उपलब्ध अभ्यासक्रम (कंसात कालावधी/वर्षे)

  • पीजी डिप्लोमा इन दिग्दर्शन आणि पटकथा लेखन (तीन वर्षे)

  • पीजी डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी (तीन)

  • पीजी डिप्लोमा इन एडिटिंग (तीन)

  • पीजी डिप्लोमा इन ध्वनी रेकॉर्डिंग आणि साउंड डिझाइन (तीन)

  • पीजी डिप्लोमा इन कला दिग्दर्शन आणि उत्पादन डिझाइन (तीन)

  • पीजी डिप्लोमा इन स्क्रीन अॅक्टिंग (दोन)

  • पीजी डिप्लोमा इन स्क्रीन रायटिंग (चित्रपट, टीव्ही आणि वेब सीरिज) (दोन)

  • पीजी प्रमाणपत्र इन दिशानिर्देश (एक)

  • पीजी प्रमाणपत्र इन इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी (एक)

  • पीजी प्रमाणपत्र इन व्हिडिओ एडिटिंग (एक)

  • पीजी प्रमाणपत्र इन ध्वनी रेकॉर्डिंग आणि टेलिव्हिजन अभियांत्रिकी (एक)

  • फूल टाइम डिप्लोमा इन ड्रामा (नाट्यशास्त्र) (तीन)

  • ॲडव्हान्स डिप्लोमा इन अॅक्टिंग (अभिनय) (दोन)

  • बी. ए. इन अॅक्टिंग (अभिनय) (तीन)

  • बी.ए. इन ड्रामा (नाट्यशास्त्र) (तीन)

एखादा अभिनेता मेहनती, शिकण्यासाठी समर्पित आणि पुरेसा चिकाटी असेल; व्यावसायिक अभिनेता बनणे नक्कीच शक्य आहे. या क्षेत्रात खूप स्पर्धा असल्याने आणि बरेच प्रवेशकर्ते ते मोठे बनवू पाहत असल्याने, अभिनेते आणि अभिनेत्रींना काम मिळविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. अभिनेत्याची मुख्य जबाबदारी म्हणजे विशिष्ट परिस्थिती आणि वर्ण हावभाव, अभिव्यक्ती, देहबोली, भाषण आणि इतर संप्रेषण साधनांचा वापर करून प्रेक्षकांशी संवाद साधणे. व्यावसायिक अभिनेता अथवा अभिनेत्री बनण्याची सुवर्णसंधी अनेक संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. अभिनय क्षेत्रात वाढत असलेल्या निपुण कलाकारांची गरज लक्षात घेऊन अनेक अभ्यासक्रम तयार केले आहेत. अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी आणि निष्णात कलावंतांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासक्रम शिकवले जातात.

अभिनयाच्या शिक्षणानंतर उपलब्ध संधी

  • सूत्रसंचालक/निवेदक

  • मुलाखतकार

  • वृत्तनिवेदक

  • नाट्य, चित्रपट तसेच दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी कलाकार/सहकलाकार

  • जाहिरातीमध्ये मॉडेलिंग

  • सिने-नाट्य दिग्दर्शक/सहाय्यक दिग्दर्शक

  • नेपथ्यकार

  • कथा, पटकथाकार

  • मेकअपमन

  • कॉस्च्युम डिझाइनर

  • सिनेमॅटोग्राफर/कॅमेरामन

  • निर्माता/सहनिर्माता

भारतातील नावीन्यपूर्ण, अधिकृत शैक्षणिक संस्था

  • नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली.

  • फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे.

  • अनुपम खेर यांचा अॅक्टर प्रिपेअर्स, मुंबई.

  • सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकता.

  • बॅरी जॉन अभिनय स्टुडिओ, मुंबई.

  • एशियन अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, मुंबई, कोलकता, नोएडा, नवी दिल्ली.

  • व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई.

  • रमेश सिप्पी अकादमी ऑफ सिनेमा अँड एंटरटेनमेंट, मुंबई.

  • कला, चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील संशोधन केंद्र, नवी दिल्ली.

  • एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा, पुणे.

  • अॅमिटी स्कूल ऑफ फिल्म अँड ड्रामा, मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com