दहावी/बारावी नंतरचे ऑफबीट ऑप्शन्स

दहावी/बारावी शिक्षणानंतरचे असे ऑफबीट कोणते ठरू शकतात व त्यानंतर करिअर संधी कोणत्या आहेत, याविषयी माहिती
education Offbeat options after 10th and  12th Got employment career Right to education Right to life
education Offbeat options after 10th and 12th Got employment career Right to education Right to lifesakal
Summary

दहावी/बारावी शिक्षणानंतरचे असे ऑफबीट कोणते ठरू शकतात व त्यानंतर करिअर संधी कोणत्या आहेत, याविषयी माहिती

- राजेश ओहोळ

दहावी/बारावी नंतरचे पारंपरिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. परंतु या संधींसाठीची स्पर्धाही तेवढीच तीव्र स्वरूपाची बनत आहे. अमुक एक अभ्यासक्रमातील शिक्षण पूर्ण झाले आणि इच्छुक ठिकाणी रोजगार मिळाला याचे प्रमाण आज तीव्र स्पर्धेने दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशा मोठ्या स्पर्धेत सर्वजण तग धरतात असेही म्हणता येणार नाही. ‘राइट टू एज्युकेशन’ हा ‘राइट टू लाइफ’ या संविधानीय मूलभूत हक्काचा भाग ठरतो. तेव्हा शिकलेल्यांना रोजगार अथवा करिअर उपलब्ध असणे हा देशाच्या सामाजिक अर्थव्यवस्थेचा जबाबदारीचा मुद्दा बनतो. जागतिक पातळीवरील स्पर्धेशी मिळतेजुळते ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेतील मनुष्यबळ व त्याच्या शैक्षणिक पात्रतेची गरज सातत्याने बदलत राहणे हे सहाजिकच आहे. उद्योग, व्यवसाय, कारखाने आदी अर्थव्यवस्थेतील घटकांना पारंपरिक शैक्षणिक पात्रताधारकांसोबत अपारंपरिक शैक्षणिक पात्रताधारकांचीही गरज अनिवार्य वाटली आहे. तसेच अशा अपारंपरिक शिक्षणाचा पर्याय स्वयंरोजगारासाठीही उमेदवारांना नेहमीच खुणावतो. (क्रमश:)

फॉरेन लँग्वेज : जर्मन, फ्रेंच, रशियन, जॅपनीज आणि स्पॅनिश

शिक्षणाचा स्तर : सर्टिफिकेट , डिप्लोमा, अॅडव्हॉन्स डिप्लोमा व स्पेशल डिप्लोमा

आवश्यक शैक्षणिक पात्रता :दहावी/बारावी/पदवी

कालावधी : एक ते तीन वर्ष

संधी कोठे? : टेक्निकल रायटर, भाषांतरकार, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये योग्य त्या पदावर नोकरी, शाळा/महाविद्यालये यामध्ये शिक्षक, केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये परदेशी भाषा शिक्षणधारकांना योग्य त्या पदांच्या नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले जाते.

पुढील उच्च शिक्षण : एम.ए./ एम.फिल./पीएच.डी.

न्यूट्रिशन अॅण्ड डायटेटिक्स

  • पदवी

  • बारावी

  • ३ वर्षे

  • डायट कन्सल्टंट, डायटिशिअन म्हणून हॉस्पिटल, हेल्थ क्लब, फिटनेस सेंटरमध्ये नोकरी अथवा स्वयंरोजगार

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (डायटेटिक्स)/ स्पोर्ट सायन्स फिटनेस अॅण्ड न्यूट्रिशन) किंवा एम.एस्सी. (न्यूट्रिशन अॅण्ड फूड प्रोसेसिंग)

फूड सायन्स अॅण्ड क्वॉलिटी कंट्रोल

  • पदवी

  • बारावी

  • तीन वर्षे

  • फूड इंडस्ट्री, फूड अॅनालिटिकल लॅबोरेटरी अथवा स्वतःचा व्यवसाय

  • एम. एस्सी. (न्यूट्रिशन अॅण्ड फूड प्रोसेसिंग), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (डायसेटिक्स)/स्पोर्ट सायन्स फिटनेस अॅण्ड न्यूट्रिशन अॅण्ड न्यूट्रिशन)

  • मेडिकल ज्युरिस्प्रिडन्स अॅण्ड फॉरेन्सिक सायन्स/सायबर लॉ/ आय.पी.आर. लॉ व अन्य

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • पदवी/बी.एस.एल./ एलएल.बी.

  • दोन वर्षे

  • विधी सल्लागार, विधी व्यवसाय, न्यायसेवा, नागरी सेवा परीक्षा आदी

  • एलएल.एम./पीएच. डी.

मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेईकल/मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेन्टेनन्स ऑफ लाइट व्हेईकल/मेकॅनिकल रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स

  • किमान पदवी

  • १ ते २ वर्षे

  • खासगी व सरकारी क्षेत्रात नोकरी अथवा स्वयंरोजगार

  • अभियांत्रिकी पदविका/पदवी शिक्षण नोकरी/व्यवसायात राहून पुढे घेता येते.

सीएनसी टेक्नॉलॉजी अॅण्ड कॅड/कॅम

  • सर्टिफिकेट/डिप्लोमा

  • ६ महिने ते १ वर्ष

  • आयटीआय/अभियांत्रिकी पदविका/अभियांत्रिकी पदवी/बी.एस्सी.

  • अभियांत्रिकी उत्पादन उद्योग/प्रकल्प/कारखाने आदींमध्ये नोकरी

  • एम.ई./ एम. टेक./एम.एस. अथवा पीएच.डी.

कॉम्प्युटर सॉफ्टवेअर लँग्वेज ः सी, सी ++, जावा, व्हिज्युअल बेसिक आदी

  • सर्टिफिकेट

  • किमान बारावी व मूलभूत कॉम्प्युटरचे ज्ञान

  • ३ महिने ते १ वर्ष

  • पदवी शिक्षणासोबत वरील कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, लँग्वेज शिक्षण, आयटी उद्योगांमध्ये नोकरीसाठी फायदेशीर

  • एम.सी.ए./एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com