Satara : विद्यार्थ्यांना प्रवेश नाका‍रणाऱ्या 'या' शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी धाडली नोटीस

शाळेतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
Schools in Satara
Schools in Sataraesakal
Summary

पाच शाळा आरटीई प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची २४ मे रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकीसाठी बोलाविण्यात आली होती.

सातारा : शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) दुर्बल व वंचित घटकाकरिता विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश नाका‍रणाऱ्या पाच शाळांच्या मुख्याध्यापकांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

तुमच्या शाळेची शाळा मान्यता रद्द करण्याची कारवाई का प्रस्तावित करू नये? अशी अंतिम कारणे दाखवा नोटीस प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी संबंधित पाच शाळांना (Primary School) बजावली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा द्यावा, अन्यथा शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्याध्यापक गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सातारा (Gurukul English Medium School Satara), मुख्याध्यापक युनिव्हर्सल नॉलेज सिटी सातारा, मुख्याध्यापक के.एस.डी. शानभाग इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, मुख्याध्यापक विवेकानंद अ‍ॅकॅडमी ऑफ ह्यूमन एक्सलन्स चिमणगाव, मुख्याध्यापक चॅलेंज अ‍ॅकॅडमी कोरेगाव या पाच शाळांना अंतिम कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

Schools in Satara
Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा

शाळेतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येणार असून, प्रवेश देण्याबाबत अनुकूलता न दाखविल्यास प्रसंगी शाळा मान्यता रद्द करणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील नियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी सूचना दिल्या असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांनी शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही केली आहे.

मात्र, पाच शाळा आरटीई प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची २४ मे रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात बैठकीसाठी बोलाविण्यात आली होती. शिक्षण विभागाने बोलाविलेल्या बैठकीस पाचही शाळांचे कोणीही उपस्थित राहिले नाही. ही बाब गंभीर असल्याचे सांगत शिक्षण विभागाने संबंधित शाळांना नोटिसा बजावली आहे.

Schools in Satara
Prithviraj Chavan : 'पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढलाय, हे आता लोकांच्या लक्षात आलंय'

गेल्या आठ दिवसापूर्वी शिक्षण विभागाने खुलासा देण्यासंदर्भात नोटीस पाठविली होती. त्या नोटीसाबाबत आम्ही खुलासा पाठविला आहे.

राजेंद्र चोरगे : अध्यक्ष, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com