‘नॉन क्रिमिलेअर’ नसले, तरी प्रवेश द्या

शिक्षण विभागाचे महाविद्यालयांना आदेश; तीस दिवस मुदतीचे हमीपत्र घेणार
Eleventh Class admission
Eleventh Class admissionsakal

पुणे : अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश (Admission) प्रक्रियेतंर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (एनसीएल) नसले, तरी आता कनिष्ठ महाविद्यालयांना (Junior college) संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता किंवा रोखता येणार नाही. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती नसली तरी अशा विद्यार्थ्यांकडून ३० दिवस मुदतीचे हमीपत्र घेऊन, त्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश द्यावेत, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.

या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या विमुक्त जमाती(व्हीजेएनटी) या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आरक्षित जागांवर प्रवेश निश्‍चित करण्यासाठी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे ‘नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र’ (एनसीएल) आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. परंतु सध्या या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत निवड होऊनही, या प्रमाणपत्राअभावी प्रवेशात अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालये प्रवेश नाकारत आहेत. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशामुळे एनसीएलअभावी प्रवेश नाकारणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांना आळा बसणार असून, विद्यार्थी - पालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Eleventh Class admission
ते येणार नसले; तरी तुम्ही मुद्द्यावर या!

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख ११ हजार २८५ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीतील ५६ हजार ७६७ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट झाली आहेत. त्यातील १४ हजार १०८ विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळपर्यंत प्रवेश घेतले आहेत. पहिल्या फेरी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Eleventh Class admission
शाळांना सरकारचा झटका : शुल्क परतावा नसला, तरी मोफत प्रवेश द्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत आलेल्या शनिवार आणि रविवारची सुटी विचारात घेता, नॉन क्रिमिलेअर (एनसीएल) बाबत पुढील निर्णय घेण्यात आला आहे. इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या विमुक्त जाती-जमाती(व्हीजेएनटी) या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणावर आधारित प्रवेश मिळाला असल्यास त्यांनी ‘एनसीएल’ देणे आवश्यक आहे. परंतु हे प्रमाणपत्र नाही, त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ‘एनसीएल’ मिळण्यासाठीची पावती नसेल तरी ३० दिवस मुदतीचे हमीपत्र घेऊन, विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत.

- मीना शेंडकर, पुणे विभागीय सहायक शिक्षण संचालक

प्रवेशाची आकडेवारी

३८,८५८

पहिल्या यादीत महाविद्यालये अँलाॅट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

१४,१०८

प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

३७

महाविद्यालयांनी नाकारलेले प्रवेश

१२

विद्यार्थ्यांनी रद्द केलेले प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com