जी.डी.सी. अँड ए. आणि सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

results

सहकार आणि लेखा विषयात पदविका (जी.डी.सी.अँड ए.) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २०२२ चा निकाल घोषित करण्यात आला आहे.

Result : जी.डी.सी. अँड ए. आणि सी.एच.एम. परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे - सहकार आणि लेखा विषयात पदविका (जी.डी.सी.अँड ए.) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा २०२२ चा निकाल घोषित करण्यात आला आहे. फेरगुण मोजणीसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

परीक्षार्थींना हा निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन व पासवर्डचा उपयोग करुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘जी.डी.सी. अॅण्ड ए. मंडळ’ या टॅबवर थेट पाहता येणार आहे.

फेरगुणमोजणीचे शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये अधिक बँक शुल्क याप्रमाणे चलनाद्वारे भरावे. बँकेचे चलन ऑनलाइन प्राप्त करून घेण्याची मुदत त्याच दिवशी रात्री २२.३० पर्यंत राहणार आहे. चलन बँकेत ३ जानेवारी पर्यंत भरणा करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, अशी माहिती जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डच्या सचिवांनी दिली.