'कॉस्ट कटींग'मध्ये आपलं नाव आलं तरी मानसिक संतुलन बिघडू द्यायचे नाही? मग 'हे' चार नियम वाचा आणि राहा आनंदी

टीम ई सकाळ
Thursday, 18 February 2021

आता तर कॉस्ट कटींगच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढले. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण आला. त्यामुळे या सर्व जास्तीच्या कामाची आपल्याला सवय झाली आहे. कोरोनामुळे आणखी उद्योग-व्यवसाय उभारले नाहीत.

नागपूर : ऑफीसमधील कामामुळे अनेकांचा ताण-तणाव वाढतो. आता तर कॉस्ट कटींगच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढले. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण आला. त्यामुळे या सर्व जास्तीच्या कामाची आपल्याला सवय झाली आहे. कोरोनामुळे आणखी उद्योग-व्यवसाय उभारले नाहीत. त्यातच कर्मचाऱ्यांना आणखी कामावरून कमी करण्याची भीती आहे. त्यात आपली नोकरी वाचविण्याचे आव्हान देखील आपल्यासमोर आहे. या काळात तणाव वाढणे हे साहजिक आहे. या तणावामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळातही तुम्हाला तुमचे मानसिक संतुलन कसे चांगले ठेवता येईल, याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा - तुम्हालाही उत्तम बॉस बनायचे आहे? मग 'हे' सात...

कठीण परिस्थितीतही स्वतःवरील नियंत्रण कायम ठेवणे -
आपली वाईट वेळ सुरू असते नेमक्या त्याचवेळी अनेक बाबी या आपल्या मनानुसार होत नसतात, असा अनेकांचा अनुभव आहे. याचप्रमाणे मंदी देखील प्रोफेशनल लाईफमधील वाईट वेळ आहे. त्यामुळे याठिकाणी आपल्या मनानुसार काही गोष्टी घडणार नाहीत. जे काही आपल्या वाट्याला येणार आहे, ते आपल्याला स्वीकारायचे आहे, अशा दृष्टीकोणातून आपण विचार केला तर नक्कीच तणाव येणार नाही. तसेच या काळातही आपल्या स्वतःवरील नियंत्रण शाबूत ठेवायचे आहे. शांत डोक्याने विचार करून येणाऱ्या समस्यांवर तोडगा कसा निघेल? याचा विचार करावा. अनेकदा आपण रागावून किंवा आतातायीपणामध्ये उत्तरे देत असतो. मात्र, यामुळे आपल्या सहकाऱ्यांसोबत आपले संबंध खराब होण्याची शक्यता असते. या मंदीच्या काळासाठी तुम्ही किंवा तुमचा सहकारी दोघांपैकी कोणीही जबाबदार नाही. मग एकमेकांवर ओरडून काय मिळणार आहे. त्यामुळे जसा चांगला वेळ निघून वाईट वेळ येतेय. त्याचप्रमाणे वाईट वेळ देखील जात असतो, हे कायम लक्षात ठेवा.

गरजेपेक्षा जास्त विचार न करणे -
इतर सजीवांपेक्षा मानवामध्ये विचार करण्याची क्षमता सर्वाधिक असते. मात्र, हीच क्षमता मंदीच्या काळात आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपली परिस्थिती वाईट आहे आणि त्याबाबतच आपण वारंवार विचार करत असेल तर आपल्याला नक्कीच टेंशन येतं. पैसा, नोकरी, कुटुंबाची काळजी या गोष्टी साहजिक आहेत. मात्र, यावेळी स्वतःला सांभाळणे आणि डोके शांत ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही तणावातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असाल. मात्र, तुम्हाला यश येत नसेल. अशावेळी तुम्ही इतरांजवळ तुमचं मन मोकळं करू शकता. त्यानंतर खूप मोठे टेंशन डोक्यावरून गेले, असे तुम्हाला जाणवेल. आपल्या व्यक्तींसोबत बोलूनही चिंता मिटत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - प्रयत्न करूनही यश मिळत नाही? मग वाचा 'हे'...

कामातून ब्रेक घ्या -
तुम्ही जास्त दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल तर ही मंदी आपल्यासाठी एक संधी आहे, असे समजा. सर्व कामातून ब्रेक घेऊन स्वतःमध्ये असणारे कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नवीन ज्ञान आत्मसात केल्यानंतर मार्केटमध्ये तुमची किंमत राहील. तसेच नव्याने नोकरीसाठी संधी उपलब्ध झाल्यावर तुम्ही त्यासाठी परफेक्ट कॅडींडेट असाल. 

आत्मविश्वास -
कितीही कठीण परिस्थिती असेल तरी तुम्ही त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत तुमच्यावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. आपण अगदी कमजोर होतो तेव्हा कुठल्याही गोष्टी आपल्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आत्मविश्वास न ठेवता तुम्ही स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घ्यायला सुरुवात करता. स्वतःला कमजोर समजायला लागता. तुमची नोकरी जाऊ शकते. मात्र, तुमचे ज्ञान कोणीही चोरू शकत नाही; ही गोष्ट डोक्यात ठेवून स्वतःला सांभाळावे.

संकलन व  संपादन - भाग्यश्री राऊत
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how recover from stress in recession time nagpur news