HSC Exam 2023 : हस्ताक्षर बदलाबाबत विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी होणार

गुन्हा दाखल होताच दोन्ही अध्यापक फरार
hsc exam 2023 students will questioned by police regarding change of handwriting
hsc exam 2023 students will questioned by police regarding change of handwriting Sakal

छत्रपती संभाजीनगर : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या ३७२ उत्तरपत्रिकांचे प्रकरण आता पोलिसांकडे वर्ग झाले आहे. बोर्डाच्या वतीने पोलिसांमध्ये दोन अध्यापकांविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही अध्यापक फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

hsc exam 2023 students will questioned by police regarding change of handwriting
HSC Result : गुजरातची पोरं ठरली कला शाखेत बाजीगर!

बारावीच्या परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या अंबाजोगाई (जि. बीड), कळमनुरी (ता.हिंगोली) येथील उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक राहुल उसारे व अध्यापिका मनीषा शिंदे यांच्याकडे तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या.

या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर यामध्ये अक्षर बदल असल्याची तक्रार देखील बोर्डाकडे केली नव्हती. त्यानंतर उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करत असताना ही बाब मॉडरेटरच्या लक्षात आली. त्यामुळे बोर्डामार्फत यासंदर्भात एक तपासणी समिती गठित केली.

hsc exam 2023 students will questioned by police regarding change of handwriting
HSC Result 2023 : पोरांची हुशारी घसरली! निकालात 2 टक्के घट, 211 अनुत्तीर्ण

चौकशीअंती उत्तरपत्रिका छेडछाड प्रकरणात बोर्डाने फर्दापूर (ता. सोयगाव) पोलिस ठाण्यात राहुल उसारे व अध्यापिका मनीषा शिंदे या दोन अध्यापकांसह एका अज्ञांतावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित दोन्ही अध्यापक फरार झाले. आता ३७२ विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com