HSC Exam : पहिला पेपर सोपा, चांगला ...!; विद्यार्थ्यांचे म्हणणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजी भाषेच्या पेपरने शुक्रवारपासून सुरवात झाली.
HSC-Exam
HSC-Examsakal
Summary

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजी भाषेच्या पेपरने शुक्रवारपासून सुरवात झाली.

पुणे - परीक्षेला (Exam) जाण्याची लगबग...परीक्षा केंद्रावर (Exam Center) पोचल्यावर रांगामध्ये होणारे थर्मल स्कॅनिंग...परीक्षा गृहात प्रवेशानंतर हातात पडलेली प्रश्नपत्रिका, एका मागून एक वेळेच्या मर्यादेची आठवण करून देणाऱ्या घंटेचा आवाज...अन्‌ अखेर काहीशा धाकधुकीत उत्तरपत्रिकेचे केलेले ‘सबमिशन’ अशा वातावरणात लाखो विद्यार्थ्यांनी (Students) बारावीची बोर्डाची परीक्षेतील (HSC Board Exam) पहिला पेपर (Paper) दिला. ‘पेपर चांगला होता, सोपा (Easy) होता’, असा अनुभव सांगत विद्यार्थ्यांनी एकदाची ऑफलाइन परीक्षा (Offline Exam) सुरू झाल्याचे समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजी भाषेच्या पेपरने शुक्रवारपासून सुरवात झाली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी मनात असणारी धाकधूक, काहीसा ताण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या चेहऱ्यावर देखील दिसत होता. ‘मुलांना, परीक्षा गृह सापडेल ना’, ‘पेपर कसा असेल’ अशा असंख्य प्रश्नांची सुरू असलेली घालमेल परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असणाऱ्या पालकांच्या चेहऱ्या दिसत होती. नऊच्या सुमारास विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून, त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन करण्यात येत होते. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

HSC-Exam
कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ११ ते १३ जूनमध्ये होणार परीक्षा

‘पहिला पेपर चांगला होता. पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिल्याने त्याचा निश्चित फायदा झाला. संपूर्ण पेपर दिलेल्या वेळेत सोडविता आला. परीक्षा ऑफलाइन होत असल्याचे समाधान आहे.’

- मृण्मयी कवेकर (परीक्षार्थी, विज्ञान शाखा)

‘महाविद्यालयात दृष्टिहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पाच ते सहा टक्के विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिराने येत असल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले. प्रत्येक पेपरसाठी परीक्षागृह बदलत राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या किमान एक-दीड तास आधी परीक्षा केंद्रावर यावे आणि परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाल्यानंतर वर्ग खोलीची चौकशी करावी. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ होणार नाही.’

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, (मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर)

पालकांनो हे लक्षात ठेवा :

- अनावश्यक ताण निर्माण होणार नाही, असे घरातील वातावरण हवे

- परीक्षार्थींना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचविण्याचे नियोजन करा

- परीक्षेच्या काळात विद्यार्थी पुरेसा आहार आणि विश्रांती घेताहेत की नाही, ते पहा

- परीक्षार्थींना भरपूर मानसिक आधार द्या, घरातील वातावरण सकारात्मक ठेवा

विद्यार्थ्यांसाठी टिप्स :

- आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा

- अनावश्यक जागरण करू नका

- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

- पेपर संपल्यानंतर त्याबद्दल फारशी चर्चा करू नका, पुढील पेपरची तयारी करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com