ISRO Recruitment | इस्रोमध्ये ५२६ पदांवर भरती; या उमेदवारांना मिळणार संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO Recruitment

ISRO Recruitment : इस्रोमध्ये ५२६ पदांवर भरती; या उमेदवारांना मिळणार संधी

मुंबई : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने सहाय्यक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक यांसारख्या विविध पदांवर भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीतून एकूण ५२६ पदे भरली जाणार आहेत. (ISRO Vacancy 2022)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार www.isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२३ आहे. हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

हेही वाचा: Friendship day : भाभांनी पंतप्रधानांचे मन वळवले आणि साराभाईंची इस्रो सुरू झाली

रिक्त जागा तपशील

एकूण पदे - ५२६

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २० डिसेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ९ जानेवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. (ISRO)

हेही वाचा: आयुष्य व्हीलचेअरवर गेलं, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनला आणि आता UPSCत यशस्वी

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असावी. राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

निवडलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या प्रक्रियेतून जावे लागेल.

अर्ज शुल्क

अर्ज करणाऱ्या सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST, PWD आणि महिला वर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

टॅग्स :IsroRecruitmentjob