JEE Mains 2023 Result : जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JEE jee mains result 2023 jee mains 2023 session 1 result declared  check  final answer key for JEE main rak94

JEE Mains 2023 Result : जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

JEE Mains 2023 Result News Update : संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2023 च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आता jeemain.nta.nic.in वर त्यांचे गुण तपासू शकतात. जेईई मेन्स सत्र 1 चा निकाल पाहण्यासाठी आवश्यक लॉगिन क्रेडेंशियल्स म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

जेईई मेनसाठी final answer key देखील जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे जेईई मेन्स २०२३ च्या पहिल्या सत्राची परीक्षा ही जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती.

यावेळी एकूण 8.6 लाख उमेदवारांनी पेपर 1 तर 0.46 लाख उमेदवारांनी पेपर 2 ची परीक्षा दिली. अभियांत्रिकीच्या पेपरसाठी एकूण उपस्थिती 95.79 टक्के होती. ही संख्या एनटीएने प्रवेश परीक्षा सुरू केल्यापासून सर्वाधिक आहे. जेईई मेन्स अंतिम अन्सर की परीक्षेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

तसेच सत्र 1 च्या निकालानंतर, NTA आज, 7 फेब्रुवारी रोजी जेईई मुख्य सत्र 2 साठी नोंदणी सुरू करेल.

निकाल कसा पाहाल?

याकरिता तुम्हाला https://ntaresults.nic.in या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर JEE Mins सत्र 1 च्या निकालाची लिंक उघडा विचारलेले लॉगिन तपशील एंटर करा. सबमिट करा आणि तुमचा निकाल पाहा.

किंवा थेट या लिंकला भेट द्या - https://ntaresults.nic.in/resultservices/JEEMAIN-auth-23