JEE NEET Exam : ‘जेईई’, ‘नीट’बाबत रविवारी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal vidya

जेईई आणि नीट परीक्षा कशी द्यायची? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत. त्याबाबत माहिती हवी आहे? त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे, तर मग रविवार (ता. ३०) पर्यंत थांबा.

JEE NEET Exam : ‘जेईई’, ‘नीट’बाबत रविवारी मार्गदर्शन

पुणे - तुम्ही नववी, दहावी आणि अकरावीची परीक्षा दिली आहे! पुढे काय करायचे?, करियरच्या संधी काय आहेत?, उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे?, जेईई आणि नीट परीक्षा कशी द्यायची? याबाबत मनात असंख्य प्रश्न आहेत. त्याबाबत माहिती हवी आहे? त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे, तर मग रविवार (ता. ३०) पर्यंत थांबा. कारण, तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार स्वारगेट येथील गणेश कल क्रीडा केंद्र येथे आयोजित केले आहे.

‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करियरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती यात दिली जाणार आहे. आपल्या सर्व परीक्षा संपल्या आहेत. काही जण दहावीत जाणार आहेत, तर काही अकरावीत, पण बारावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे?, कोणती विद्या शाखा निवडायची?, इंजिनिअरिंग करायचे की मेडिकलला जायचे?, याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका असतील, प्रश्न असतील. त्यांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पेस आयआयटी अँड मेडिकल’ (प्रोफेशनल ॲकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन) यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष करून ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेशासंदर्भात मार्गदर्शनावर भर असेल.

सेमिनारविषयी....

  • काय : जेईई आणि नीट परीक्षेबरोबरच करिअर

  • निवडीसंदर्भात मार्गदर्शन

  • कधी : रविवारी (ता. ३० एप्रिल

  • केव्हा : सकाळी १० वाजता

  • कुठे : गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट

  • प्रवेश : विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

सहभागासाठी संपर्क

  • सचिन : ९९२२९१३५१०

  • संदीप : ८३८००७२०४९