Job Alert | अभियंत्यांसाठी मोठी संधी; NTPCमध्ये ३०० पदांवर भरती job for engineers recruitment in NTPC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Alert

Job Alert : अभियंत्यांसाठी मोठी संधी; NTPCमध्ये ३०० पदांवर भरती

मुंबई : नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट - https://careers.ntpc.co.in वर ३०० रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना २०२३ प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रिया १९ मे २०२३ पासून सुरू झाली आहे आणि २ जून २०२३ रोजी संपेल. NTPC असिस्टंट मॅनेजरसाठी इच्छुक या लेखातील वयोमर्यादा, पगार इत्यादी तपशील तपासू शकतात. (job for engineers recruitment in NTPC)

भरती अधिसूचनेनुसार सर्व रिक्त जागा ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भरल्या जातील. उमेदवार सविस्तर अधिसूचनेत तंत्रज्ञ पदांसाठी अधिक तपशील तपासू शकतात. सर्व तपशील अधिसूचनेत दिलेला आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.

महत्वाची तारीख

१९ मेपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.

- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३.

लेखी परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.

फॉर्म फी

सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

SC, ST आणि PWD उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

भरती तपशील

- इलेक्ट्रिकलसाठी एकूण १२० पदे

- मेकॅनिकलसाठी एकूण १२० पदे

इलेक्ट्रॉनिक्स – इन्स्ट्रुमेंटेशनसाठी ६० पदे

एकूण पदांची संख्या ३०० आहे.

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून किमान ६०% सह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशनमध्ये B.Tech केलेले असावे. यासोबतच उमेदवारांना ७ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

वय श्रेणी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

ऑनलाइन चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

टॅग्स :Recruitmentjob