संधी नोकरीच्या : उत्तम करिअरसाठी कसे निवडाल इंजिनिअरिंग कॉलेज आणि योग्य ट्रेड

डॉ. शीतलकुमार रवंदळे
Thursday, 17 December 2020

अभियांत्रिकीच्या शाखेपेक्षा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे जास्त महत्त्वाचे. तुम्हाला नामांकित महाविद्यालयातील खूप आवडीची शाखा मिळत नसल्यास थोडी कमी आवडीची शाखा नामांकित महाविद्यालयातील निवडणे चांगले. नामांकित ग्रुपच्या सर्वच महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची व प्लेसमेंटची समान संधी उपलब्ध असते. चांगल्या ग्रुपच्या बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे नोकरीची संधी दिली जाते.

अभियांत्रिकीच्या शाखेपेक्षा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे जास्त महत्त्वाचे. तुम्हाला नामांकित महाविद्यालयातील खूप आवडीची शाखा मिळत नसल्यास थोडी कमी आवडीची शाखा नामांकित महाविद्यालयातील निवडणे चांगले. नामांकित ग्रुपच्या सर्वच महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची व प्लेसमेंटची समान संधी उपलब्ध असते. चांगल्या ग्रुपच्या बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे नोकरीची संधी दिली जाते.

अभियांत्रिकीच्या प्रत्येक शाखेला संधी असते. तुम्ही  तुमच्या शाखेमधील विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या ५ ते १० टक्क्यांत असल्यास तुम्ही तुमचे उत्तम करिअर घडवू शकतात. त्यामुळे निवड करताना शाखेपेक्षा महाविद्यालयाला जास्त महत्त्व द्यावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीसीसीओईसारख्या ऑटोनॉमस महाविद्यालयामधील नॉन आयटी शाखांमधील (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन) विद्यार्थी देखील कॉम्प्युटर शाखांमधील विषय घेऊन मायनर डिग्री (Honours / Minor) घेऊ शकतो.      

कॉम्पुटर व आयटी शाखांमधील फरक
विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये हा प्रश्न प्रामुख्याने उद्भवतो. दोन्ही शाखांमध्ये बऱ्यापैकी समानता आहे. कॅम्पस प्लेसमेंट करणाऱ्या आयटी क्षेत्रातील नामांकित कंपन्या दोन्ही शाखांना समान संधी देतात.

No photo description available.    

फर्स्ट शिफ्ट व सेकंड शिफ्टमधील फरक
फर्स्ट शिफ्ट व सेकंड शिफ्टमध्ये जास्त फरक नसतो. गुणवत्तापूर्वक शिक्षण, कॅम्पस प्लेसमेंटच्या संधी व इतर प्रमुख पायाभूत सुविधा दोन्ही शिफ्टमधील विध्यार्थ्यांना सारख्याच उपलब्ध असतात.

महाविद्यालय व शाखांची निवड करताना
गेल्या वर्षीचा CET चा कट ऑफ (+ ५  किंवा - ५ % गुणांमध्ये बदल होऊ शकतो)

कॅम्पस प्लेसमेंटच्या संधी

  • महाविद्यालयाचे  रँकिंग (NIRF/ Times /Dataquest) 
  • शासनाचे ऍक्रिडिटेशन ( NBA / NAAC )  वैयक्तिक आवड 
  • उपलब्ध सुविधा  महाविद्यालयात शिकत असलेल्या व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाविषयी अभिप्राय  प्राध्यापकांचा अनुभव

प्रत्येक फेरीसाठी ३०० पर्याय 
विद्यार्थी प्रत्येक फेरीत एकूण  ३०० पर्याय देऊ शकतो. आवडत्या महाविद्यालय व शाखेचा एक १० अंकी कोड तयार होतो. उतरत्या क्रमाने विद्यार्थ्याने ते भरावयाचे असतात. त्यासाठी गेल्या वर्षीचे विविध महाविद्यालयांतील वेगवेगळ्या शाखांचे कट ऑफ मार्क्स बघून आपण आपल्याला योग्य असलेल्या ३०० पैकी कितीही पर्यायांची यादी बनवून ठेवावी. एक्सेल शीटमध्ये ही यादी तयार ठेवावी. आपल्याला मिळालेल्या CET परीक्षेतील  पर्सेंटाइलमध्ये ५ मार्क्स वाढवून व ५ मार्क्स कमी करून मार्क्सची साधारणपणे रेंज ठरवता येईल. मागील वर्षातील विविध फेऱ्यांमधील कट ऑफची यादी खाली दिलेल्या फाइल्समध्ये बघता येईल :
मागील वर्षाचे कट ऑफ : राउंड १
https://tinyurl.com/Round-I-Cutoffs
मागील वर्षाचे कट ऑफ : राउंड २
https://tinyurl.com/Round-II-Cutoffs
मागील वर्षाचे कट ऑफ : राउंड ३
https://tinyurl.com/Round-III-Cutoffs

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Opportunities Choice of Engineering College and Branch