‘यूपीपीसीएल’कडून भरती प्रक्रिया

उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल)ने असिस्टंट अकाउंटंट्‌स (सहाय्यक लेखापाल) गट-सी या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे
‘यूपीपीसीएल’कडून भरती प्रक्रिया
‘यूपीपीसीएल’कडून भरती प्रक्रिया

सोलापूर : उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल)ने असिस्टंट अकाउंटंट्‌स (सहाय्यक लेखापाल) गट-सी या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीची अर्ज प्रक्रिया ८ ऑक्‍टोबर २०२१ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्‍टोबर २०२१ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट uppcl.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण २४० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या संकेतस्थळावर उपलब्ध संबंधित भरती अधिसूचनेमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (कॉमर्स) शाखेची पदवी पूर्ण केली आहे.

‘यूपीपीसीएल’कडून भरती प्रक्रिया
दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत 3 हजार जागा; परीक्षेशिवाय मिळणार 'नोकरी'

त्याचबरोबर उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्‍चित केले आहे. १ जुलै २०२१ रोजी वयाची गणना केली जाईल. राज्याच्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे. पात्रतेच्या निकषांच्या अधिक तपशिलांसाठी अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकता. ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com