Justice NV Ramana: शेतकऱ्याचा मुलगा बनणार सरन्यायाधीश!

Justice_Ramana
Justice_Ramana

नवी दिल्ली : सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे भावी सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश बोबडे यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहलेल्या पत्रात रमणा हे सर्वात योग्य असल्याचे म्हटले आहे. कोण आहेत हे रमणा? याविषयी अधिक जाणून घेऊया.  

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते गंभीर आरोप 
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जनग मोहन रेड्डी यांनी सरन्यायाधीश बोबडे यांच्याकडे रमणा यांच्याविरोधात तक्रार दिली होती. रमणा आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्यासोबत सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. इन-हाऊस तपासानंतर मुख्यमंत्री जनग मोहन रेड्डींचे आरोप हे चुकीचे, निराधार, खोटे आणि न्यायपालिकेला धमकावण्याचा प्रयत्न असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, न्यायमूर्ती रमणा यांच्या दोन मुलींनी अमरावतीत जमीन खरेदी केली होती, तसेच जाणीवपूर्वक जगन मोहन सरकारविरोधात आदेश दिले होते, असं मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

४८ वे सरन्यायाधीश बनणार रमणा
विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे हे २३ एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे २४ एप्रिलला न्यायमूर्ती रमणा सर्वोच्च न्यायालयाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून निवड होणारे रमणा हे आंध्र प्रदेशातील पहिले व्यक्ती ठरणार आहेत. तर तेलुगू भाषा बोलणारे ते दुसरे व्यक्ती ठरतील. याआधी ३० जून १९६६ रोजी सुब्बा राव हे पहिले तेलुगू भाषिक सरन्यायाधीश ठरले आहेत. 

शेतकरी कुटुंबात जन्म
न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांचा जन्म २ ऑगस्ट १९५७ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम हे त्यांचं गाव. १० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी स्वत:ची नोंदणी करत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर २७ जून २००० रोजी ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात कायमस्वरुपाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. २ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले. आणि आता सरन्यायाधीश बोबडे यांच्यानंतर रमणा हे सरन्यायाधीश बनणार आहेत.

सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बनतात सरन्यायाधीश
नियमांनुसार, सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्त केले जाते. कायदामंत्री विद्यमान सरन्यायाधीशांकडून उत्तराधिकाऱ्यांची नावे मागवतात. सरन्यायाधीशांकडून शिफारस पत्र मिळाल्यानंतर ते पंतप्रधानांसमोर ठेवले जाते. सरन्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान राष्ट्रपतींना सुचवतात.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com