करिअर घडविताना : कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट

केंद्रीय विद्यापीठांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देणार.
common university entrance test
common university entrance testsakal
Summary

केंद्रीय विद्यापीठांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देणार.

- के. रवींद्र

केंद्रीय विद्यापीठांमध्ये विशेषत: ग्रामीण आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना समान व्यासपीठ आणि समान संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देशभरातील केंद्रीय विद्यापीठ (४६), राज्य विद्यापीठ (३४), डिम्ड युनिव्हर्सिटी (२५), खासगी विद्यापीठ (८४) विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. यासाठी ३० मार्च २०२३ पर्यंत नोंदणी करता येईल व परीक्षा ता. २१ ते ३१ मे २०२३ दरम्यान आयोजित केली जाईल.

कोर्सेस

अकाउंटन्सी, शेती, मानववंशशास्त्र, कला शिक्षण शिल्पकला, जीवशास्त्र, व्यवसाय अभ्यास, रसायनशास्त्र, संगणक शास्त्र, अर्थशास्त्र/व्यवसाय अर्थशास्त्र, अभियांत्रिकी ग्राफिक्स, उद्योजकता, पर्यावरण अभ्यास, सामान्य चाचणी, भूगोल, इतिहास, गृहशास्त्र, ज्ञान परंपरा, प्रॅक्टिसेस इंडिया, भाषा (IA आणि IB), कायदेशीर अभ्यास, मास मीडिया/मास कम्युनिकेशन, गणित, परफॉर्मिंग आर्ट्स, शारीरिक शिक्षण, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, संस्कृत, समाजशास्त्र, टीचिंग अ‍ॅप्टिट्यूड इ.

  • परीक्षेची पद्धत - अंडरग्रॅज्युएट - २०२३ पूर्णपणे संगणक आधारित चाचणी मोडमध्ये घेतली जाईल.

  • प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न - वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

  • पात्रता निकष - भारतीय राष्ट्रीय नागरिक अर्ज करण्यास पात्र असतील.

  • पात्रता - अंडरग्रॅज्युएटसाठी, उमेदवारांनी बारावी स्तराची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

  • वयोमर्यादा - परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा असणार नाही.

  • टीप - विविध विद्यापीठांनुसार पात्रता निकष वेगवेगळे असू शकतात.

  • भाषा - अंडरग्रॅज्युएट स्तरावरील अभ्यासक्रमासाठी १३ भाषा असतील. पंजाबी, तेलगू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, इंग्रजी, हिंदी, उडिया, तमीळ आणि उर्दू यापैकी विद्यार्थी कोणतीही एक भाषा निवडू शकतो.

परीक्षेचा अर्ज

अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://cuet.samarth.ac.in या पोर्टलवर भरायचा आहे.

अर्ज भरताना, उमेदवारांनी विहित नमुन्यात पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यास विसरू नये.

फॉर्ममध्ये चुकीचे तपशील (असल्यास) दुरुस्तीसाठी १ ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत उमेदवारांना दुरुस्तीची सुविधा दिली जाईल.

महत्त्वाच्या लिंक - https://cuet.samarth.ac.in

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com