करिअर घडविताना : ‘एमएचटी-सीईटी’ प्रवेश परीक्षा

महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविली जाते.
MHT-CET entrance exam
MHT-CET entrance examsakal
Summary

महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविली जाते.

- के. रवींद्र

महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविली जाते. एमएचटी-सीईटी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा दोन गटात घेतली जाईल. पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र). अभियांत्रिकी, फार्मसी व तसेच कृषी अभ्यासक्रमामधील वेगवेगळ्या कोर्सनुसार पीसीएम/पीसीबी विषयांची निवड ‘एमएचटी-सीईटी’चा अर्ज भरताना करावी लागेल.

वेळापत्रकानुसार, परीक्षेची तारीख पीसीएम ९ ते १३ मे आहे तर पीसीबी परीक्षा १५ ते २० मे दरम्यान घेतली जाईल. अर्ज नोंदणी सुविधा ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन भरता येईल.

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा महाराष्ट्रातील ३२६ इंजिनिअरिंग, ३९६ फार्मसी तर कृषी २११ महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी राबविली जाते.

  • अभ्यासक्रम -

  • इंजिनिअरिंग - बीई/बीटेक

  • फार्मसी - बी. फार्मसी/फार्मा डी

  • कृषी - बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी. एस्सी.(ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ. एस्सी. (मत्स्यविज्ञान), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (तंत्रज्ञान), बी. एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान). बी. टेक. (जैवतंत्रज्ञान) आणि बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा अनिवार्य आहे.

पेपर पॅटर्न

‘एमएचटी-सीईटी’ पेपर पॅटर्ननुसार, परीक्षा संगणक आधारित चाचणी ऑनलाइन घेतली जाईल. प्रश्नपत्रिकेत एकापेक्षा जास्त पर्याय असलेले प्रश्न (MCQs) असतील ज्यामध्ये चार पर्याय असतील ज्यात एक बरोबर असेल. परीक्षेत नकारात्मक मार्किंग असणार नाही पण प्रश्नांची पातळी JEE Main सारखीच असेल.

PCM विभाग

  • विभाग १- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र

  • विभाग २- गणित

  • PCB विभाग

  • विभाग १- भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र

  • विभाग २- बायॉलॉजी

  • परीक्षेचा कालावधी - १८० मिनिटे (प्रत्येक विभागासाठी ९० मिनिटे)

  • एकूण प्रश्नांची संख्या - १५० (प्रत्येक विषयासाठी ५० प्रश्न)

  • एकूण गुण - २०० गुण (प्रत्येक विभागासाठी १०० गुण)

  • परीक्षेची भाषा - गणित इंग्रजी भाषेत

  • भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र इंग्रजी/उर्दू/मराठीमध्ये

आवश्यक कागदपत्रे

  • दहावीची गुणपत्रिका

  • बारावीची गुणपत्रिका (असल्यास)

  • जन्मतारीख पुरावा

  • पत्त्याचा पुरावा

  • उमेदवाराच्या नावाने भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र.

  • महाराष्ट्र अधिवास (डोमासाईल) प्रमाणपत्र.

  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • जात/जमाती वैधता प्रमाणपत्र. (लागू असल्यास)

  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • पासपोर्ट साईज आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेला फोटो

  • फी भरण्यासाठी क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग

  • तपशील इ.

महत्त्वाच्या लिंक : https://mhtcet2023.mahacet.org

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com