नोकरीसाठी Interview ला जाताय? मग या महत्वाच्या टिप्स नक्की वाचा; जॉब तुम्हालाच मिळणार

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613924645353,"A":[{"A?":"I","A":54,"B":764.4452264125928,"D":152.69125639596655,"C":47.55324403514686,"a":{"B":{"A":{"A":"MAEWe89Px04","B":1},"B":{"A":-0.23050
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1613924645353,"A":[{"A?":"I","A":54,"B":764.4452264125928,"D":152.69125639596655,"C":47.55324403514686,"a":{"B":{"A":{"A":"MAEWe89Px04","B":1},"B":{"A":-0.23050

नागपूर : जीवनात प्रत्येकाला खूप यश मिळवून मोठं व्हायचं असतं. मी खूप चांगली नोकरी मिळवणार  आणि खूप मोठा माणूस होणार हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्यातील कमी आत्मविश्वास. आत्मविश्वासात कमतरता असल्यामुळे अनेकांना नोकरी मिळत नाही. मात्र नोकरी न मिळण्याला फक्त आत्मविश्वासच जवाबदार नाही. चांगली नोकरी मिळवण्यासाठी Interview ला जाताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींचं पालन कारणंही आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Interview ला गेल्यावर कुठल्या गीष्टी कराव्या आणि कुठल्या करू नये याबद्द्दल टिप्स देणार आहोत. त्यामुळे ही बातमी संपूर्ण वाचा. जॉब तुम्हालाच मिळणार हे नक्की. 

या महत्वाच्या टिप्स ठेवा लक्षात 

Interview ला जाताना वेळेत जा 

जर तुम्हाला लगेच नोकरी मिळवायची असेल तर Interview ला कधीच उशीर करू नका. याची मुख्य दोन कारणं आहेत. Interview घेणारी लोकं तुम्ही वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहात हे बघत असतात. तसंच वेळेच्या १५ आधी गेल्यास तुम्हाला तयारी करायला वेळ मिळतो तसंच तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. म्हणूनच Interview ला जाताना कधीच उशीर करून नका. नेहमी १५ ते २० मिनिटं आधी जाण्याचा प्रयत्न करा. 

रिसर्च करणं महत्वाचं 

कुठल्याही कंपनीमध्ये Interview ला जाताना त्या कंपनीबद्दल संपूर्ण रिसर्च करून जाणं महत्वाचं आहे. त्या कंपनीच्या वेबसाईटला नक्की बघा. Interview च्यावेळी तुम्हाला कंपनीबद्दल काही प्रशासन विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे त्या कंपनीबद्दल संपूर्ण माहिती घेऊनच Interview ला जा. 

पेहरावाकडे लक्ष द्या 

तुम्हाला नोकरी मिळेल की नाही हे तुम्ही  Interview ला जाताना घातलेल्या कपड्यांवरही अवलंबून असतं. तुम्ही जर इस्त्री न केलेले चोळामोळा कपडे घालून गेलात तर तुम्ही किती आळशी आणि बेजबाबदार आहात असा समोरच्या व्यक्तीचा समज होतो. म्हणूनच  Interview ला जाताना स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून जा. तसंच कपडे फॉर्मलच घालून जा जीन्सपॅन्ट किंवा टी-शर्ट घालून जाऊ नका. तसंच महिलांनी साडी किंवा सलवार सूट घालून  Interview ला जाणं कधीही चांगलं. 

बोलण्याची गती कमी ठेवा 

तुमच्या कपड्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बोलणं. Interview दरम्यान बोलताना नेहमी हळू आवाजात बोला. तसंच तुमच्या बोलण्याची गती कमी ठेवा ज्यामुळे समोरील व्यक्तीला तुमचं बोलणं स्पष्ट ऐकू येण्यास मदत होईल. तसंच बोलण्यात आत्मविश्वास नक्की ठेवा. 

तुमचा बायोडाटा महत्वाचा 

Interview दरम्यान तुमच्यापेक्षा तुमचा बायोडाटा समोरील व्यक्तीला तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगतो. त्यामुळे तुमचा बायोडाटा नेहमी अपडेटेड असायला हवा. बायोडाटामध्ये नेहमी तुमचा अनुभव, तुम्ही काम केलेल्या कंपनीचं नाव, तुमचे छंद, तुमचं शिक्षण या सर्व गोष्टींबद्दल माहिती द्या. मात्र याचा अर्थ तुमचा बायोडाटा १५-२० पानांचा तयार करू नका. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच बायोडाटामध्ये लिहा. तसंच बायोडाटाचं प्रिंट करताना नेहमी बॉंड पेपरवरच करा. 

तुम्ही आहात खास 

Interview दरम्यान तुम्ही इतरांपेक्षा किती वेगळे आहात हे दर्शविण्याचा प्रयत्न करा. आपल्यातील प्रत्येक चांगला गुण हा एखाद्या उदाहरणासह स्पष्ट करा. तसंच अतिआत्मविश्वास बाळगू नका. 

३ स्ट्रेंथ आणि ३ विकनेस 

Interview दरम्यान तुम्हाला तुमच्यातील तीन स्ट्रेंथ आणि तीन विकनेसबद्दल हमखास विचारण्यात येईल. अशावेळी घाबरू नका. तुमच्या विकनेस सांगताना त्यांना तुमच्या स्ट्रेन्थमध्ये परावर्तित करा. उदा. मी कोणालाही नाही म्हणू शकत नाही. मात्र या माझ्यातील गुणामुळे मी कोणाचंही मन दुखवत नाही. यामुळे तुमचं इम्प्रेशन चांगलं जाईल आणि तुम्हाला नोकरी मिळेल. 

प्रश्न विचारताना घाबरू नका

Interview दरम्यान जर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर बिनधास्त न घाबरता प्रश्न विचारा. यामुळे तुमची निडरता सर्वांना दिसेल आणि तुम्हालाच ती नोकरी मिळेल. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com