24 जिल्ह्यांत इंग्रजीचा पेपर फुटला; पेपरफुटीमुळं परीक्षा रद्द

UP 12th Board Exam
UP 12th Board Examesakal
Summary

डिसेंबर-जानेवारी महिन्यातही टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाला होता.

नवी दिल्ली : यूपीमध्ये आणखी एक बारावी बोर्ड परीक्षेचा (UP 12th Board Exam) पेपर फुटला आहे. ANI च्या वृत्तानुसार, 24 जिल्ह्यांमध्ये यूपी बोर्डाच्या 12 वी परीक्षेचा इंग्रजी पेपर लीक (English Paper Leaked) झालाय. या पेपरफुटीमुळं 24 जिल्ह्यांमध्ये बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून होणारी परीक्षा रद्द (Exam Canceled) करण्यात आलीय. म्हणजेच, या 24 जिल्ह्यांमध्ये आज इंग्रजी विषयाची परीक्षा होणार नाहीय.

परीक्षा रद्द करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये आग्रा, एटा, बागपत, बदाऊन, सीतापूर, कानपूर देहात, ललितपूर, चित्रकूट, प्रतापगड, गोंडा, आझमगड, बलिया, वाराणसी, मैनपुरी, मथुरा, अलीगढ, गाझियाबाद, शामली, शाहजहानपूर, उन्नाव, जालौन, महोबा, आंबेडकर नगर आणि गोरखपूर यांचा समावेश आहे. आझमगड डीआयओएस प्रवीण कुमार उपाध्याय यांनी सांगितलं की, एकाच कोडच्या प्रश्नपत्रिकेमुळं परीक्षा रद्द करण्यात आलीय. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं ते म्हणाले.

UP 12th Board Exam
कोल्हापुरातील जयसिंगपूरमध्ये दहावीचा पेपर फुटलाच नाही, जुनाच पेपर व्हायरल

डिसेंबर-जानेवारी महिन्यातही यूपी टीईटी परीक्षेचा (UP TET Exam) पेपर लीक झाला होता. या प्रकरणी शिक्षण विभागाच्या संचालकाला उत्तर प्रदेश एसटीएफनं अटक करुन न्यायालयात हजर केलं होतं. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी एसटीएफनं अलीगडमधून एका व्यक्तीला अटक केली होती, तर दिल्लीतील एका प्रिंटिंग प्रेसच्या मालकालाही अटक करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com