Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभागात १२७ जागांसाठी भरती, पदवीधारकांना सुवर्ण संधी l Maha Forest Recruitment 2023 accountant nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Forest Recruitment

Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभागात १२७ जागांसाठी भरती, पदवीधारकांना सुवर्ण संधी

Maha Forest Recruitment : वन विभाग नागपूर येथे भरती निघाली असून याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एकूण १२७ जागांसाठी करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे - १२७

पद - लेखापाल (गट क)

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट - १८ ते ३५ वर्षे (मागासवर्गिय, अनाथ यांना ५ वर्षे सूट)

परीक्षा फी - १००० रुपये (मागासवर्गिय, अनाथ यांना ९०० रुपये, तर माजी सैनिकांना शुल्क नाही)

पगार - २९००० ते ९२,३०० रुपये (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)

निवडीची पद्धत - ऑनलाइन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाचे अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-२ म्हणून जोडले आहे.

लेखी परीक्षा :-
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.

लेखी परीक्षा विषय- गुण
मराठी- ५०
इंग्रजी -५०
सामान्य ज्ञान – ५०
बौधिक चाचणी – ५०

  • परीक्षा ऑनलाइन ऑब्जेक्टीव्ह पेपर असणार आहे.

  • परीक्षा २ तासाची असते.

  • लेकी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

  • ४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांना गुणवत्तेनुसार पदा करीता पात्र ठरवण्यात येईल.

  • ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे बाद ठरवण्यात येतील.

  • निकाल वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येइल.

कागदपत्र तपासणी - लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येइल.

यावेळी उमेदवाराने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असेल. (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-३ प्रमाणे).

जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून अदिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. निवड यादी आणि वेटींग लिस्ट तिथेच जाहीर करण्यात येईल. ही यादी तयार करताना सामान्य प्रशासनविभाग, शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद १० मधील दरबनीनुसार करण्यात येईल.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत संकेतस्थळ - www.mahaforest.gov.in