esakal | राज्यात तीन लाख युवकांना रोजगाराची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

राज्यात तीन लाख युवकांना रोजगाराची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील तीन लाख तरुण-तरुणींना पुढील तीन वर्षांच्या कालावधीत बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती आज राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासाठी आज महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील तरुण-तरुणींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून त्याचे हस्तांतर केले. या उपक्रमांतर्गत पुढील ३ वर्षांत राज्यातील ३ लाख तरुण-तरुणींना बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, अकाउंटिंग, आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वंचित घटकांवर भर!

राज्यातील विशेषत : वंचित घटकांपर्यंत प्रशिक्षण पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.

कोरोनाच्या साथीमुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वित्तीय क्षेत्रात मनुष्यबळाची वाढती मागणी आहे; पण त्या तुलनेत आपल्याकडे कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. आज झालेल्या सामंजस्य करारातून आणि त्याद्वारे तरुण-तरुणींना मिळणाऱ्या प्रशिक्षणातून ही कमतरता दूर होईल. या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्धत करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येईल.

- नवाब मलिक, कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र

loading image
go to top