खेलेगा इंडिया... : खेळाला ‘मनो’बल देणारे शास्त्र

खेलेगा इंडिया... : खेळाला ‘मनो’बल देणारे शास्त्र

आधुनिक जीवनात खेळासाठी जास्तीत जास्त स्पर्धात्मक वातावरण असते आणि त्याचा परिणाम म्हणून खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा दृष्टिकोन सतत बदलत राहतो.
Summary

आधुनिक जीवनात खेळासाठी जास्तीत जास्त स्पर्धात्मक वातावरण असते आणि त्याचा परिणाम म्हणून खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा दृष्टिकोन सतत बदलत राहतो.

- महेंद्र गोखले

आधुनिक जीवनात खेळासाठी जास्तीत जास्त स्पर्धात्मक वातावरण असते आणि त्याचा परिणाम म्हणून खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा दृष्टिकोन सतत बदलत राहतो. गेल्या शतकात खेळातील झालेल्या या सगळ्या बदलांपैकी महत्त्वाचा बदल म्हणजे क्रीडा मानसशास्त्र. स्पर्धात्मक खेळाचा फायदा मिळवण्यासाठी, कोणत्याही स्तरावर स्पर्धा करणाऱ्या सर्व खेळाडूंकडून मानसशास्त्राचा जास्तीत जास्त वापर करण्याचे प्रयत्न दिसून येतात. मानसशास्त्राच्या अशा वापरामुळे क्रीडा मानसशास्त्राची निर्मिती झाली आणि त्यात संशोधन सुरू झाले. क्रीडा मानसशास्त्र हे क्रीडा संदर्भातील मानसशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. क्रीडापटूंच्या मानसिक विचारप्रक्रिया समजून घेणे; तसेच व्यावसायिक क्रीडा वातावरणात, खेळाडूंचे एकूण मानसिक आरोग्य आणि कामगिरी सुधारण्यासाठी काही योजना किंवा युक्त्याचा वापर करणे, याचा क्रीडा मानसशास्रात समावेश होतो. ‘स्पोर्ट सायकोलॉजी’ हे एक शास्त्र आहे- ज्यामध्ये मानसशास्त्राची तत्त्वे व्यायाम किंवा खेळाच्या सेटिंगमध्ये वापरली जातात आणि त्याचा उपयोग कामगिरी उंचावण्यासाठी केला जातो. क्रीडा मानसशास्त्राचा उपयोग खेळाडूंच्या व्यवस्थापनाचा भाग म्हणून केला जाऊ शकतो, तसेच रिकव्हरी व पूर्ववत खेळासाठी, आणि फिजिओथेरपी, स्पोर्ट्‌स थेरपी या तंत्रासाठीही केला जातो.

क्रीडा मानसशास्त्र कधी वापरावे?

क्रीडा मानसशास्त्र हे खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून उत्तम कामगिरीचे सातत्य राखण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक असणारे विविध दृष्टिकोन विकसित करण्यासाठी वापरले जाते. व्यावसायिक क्रीडापटूंसाठी क्रीडा मानसशास्त्र हा एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो आणि व्यावसायिक खेळामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. एखाद्या खेळाडूला सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी आणि त्यात सातत्य राखण्यासाठी क्रीडा मानसशास्त्र उपयोगी पडते.

क्रीडा मानसशास्त्राचा उपयोग

काही क्रीडा संस्था मोठ्या संघासोबत काम करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञाची नेमणूक करतात. काही वेळा खेळाडू स्वतंत्रपणे क्रीडा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतो किंवा त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरून संपर्क करून त्यांची मदत घेतो.

क्रीडा मानसशास्त्राचे महत्त्व

एखाद्या खेळाडूला खेळाच्या कोणत्याही पैलूंसाठी संघर्ष करावा लागत असेल किंवा ताण, चिंता यापासून ते अगदी नैराश्य किंवा मानसिक थकवा जाणवत असल्यास त्याने क्रीडा मानसशास्त्रज्ञाची मदत घेणे गेम चेंजर ठरते. क्रीडा मानसशास्त्र प्रेरणा, आत्मविश्वास, प्रतिपक्षामुळे निर्माण होणारी अधीरता अशा खेळाडूच्या मानसिक आणि भावनिक पैलूवर काम करते.

एक खेळाडू सकारात्मक आत्मसंवाद, विचार आणि भावनांद्वारे आत्मविश्वास वाढवू शकतो. खेळाडूचा आत्मविश्वास आणि त्याची यशस्वी कामगिरी यांच्यात परस्परसंबंध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, सकारात्मक विचारसरणीला प्रोत्साहन देणे, सकारात्मक विधानांचा वापर करणे आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते आणि त्यामुळे सातत्यपूर्ण आधारावर कामगिरी सुधारू शकता. खेळातील कामगिरी उंचावण्यासाठी मानसशास्त्राची मदत आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणजे ध्येय-निश्चिती. त्याचप्रमाणे सेल्फ-टॉक(स्वयं-संवाद) या प्रक्रियेच्या मर्यादा असतात आणि कामगिरी सुधारण्यासाठी इतर घटकांचा समावेश करावा लागतो. कामगिरी उंचावण्यासाठी कोणत्याही ध्येयाचा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे ध्येय हे अस्पष्ट किंवा आव्हानात्मक नसून ते विशिष्ट आणि आव्हानात्मक असले पाहिजे. S.M.A.R.T. हा शब्द अनेकदा या संदर्भात वापरला जातो, प्रत्येक ध्येय हे विशिष्ट, मोजता येण्याजोगे, आव्हानात्मक; परंतु साध्य करण्यायोग्य असले पाहिजे; तसेच ते ॲथलीटशी संबंधित आणि वेळेच्या शेड्यूलमध्ये बांधलेले असावे.

एका खेळाडूसाठी त्याच्या खेळाचे कौशल्य आणि तंत्र जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे क्रीडा मानसशास्त्र आहे. खेळाडूंच्या यशामध्ये क्रीडा मानसशास्त्र खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com