खेलेगा इंडिया... : लहान मुलांचे ट्रेनिंग : आनंददायी अनुभव

आपल्या सगळ्यांना मुलं आणि त्यांचे रुसवे-फुगवे आवडतात. मुलांसोबत वेळ घालवणं आणि त्यांना अॅथलिट बनण्यासाठी प्रशिक्षित देणं ही अतिशय आनंददायी प्रक्रिया असते.
Boxing Training
Boxing TrainingSakal
Summary

आपल्या सगळ्यांना मुलं आणि त्यांचे रुसवे-फुगवे आवडतात. मुलांसोबत वेळ घालवणं आणि त्यांना अॅथलिट बनण्यासाठी प्रशिक्षित देणं ही अतिशय आनंददायी प्रक्रिया असते.

- महेंद्र गोखले

आपल्या सगळ्यांना मुलं आणि त्यांचे रुसवे-फुगवे आवडतात. मुलांसोबत वेळ घालवणं आणि त्यांना अॅथलिट बनण्यासाठी प्रशिक्षित देणं ही अतिशय आनंददायी प्रक्रिया असते. मुलांबरोबर वेळ घालवायला मिळणं ही माझ्या आयुष्यात घडणारी अतिशय उत्तम गोष्ट आहे. मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे खेळ शिकवणे. खेळामुळे मुलांची मानसिक वाढ होते आणि त्यांना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये शिकता येतात. योजनाबद्ध प्रशिक्षणामुळे मुलांना मानसिक आणि सामाजिक फायदा होतो. खेळादरम्यान शारीरिक हालचालींपेक्षाही खेळातून होणारा विकास हा नवीन शारीरिक कौशल्ये शिकण्यापलीकडे जातो. खेळामुळे मुले जीवनातील चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करायला शिकतात. खेळात मुले हरतात आणि त्यातून ते पराभव मोठ्या मानाने स्वीकारायला शिकतात आणि त्या अनुभवातून ते मच्युअर्ड होतात. खेळामुळे मुले त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि नकारात्मक भावनांना सकारात्मक मार्गाने पुढे न्यायला शिकतात. खेळामुळे मुले संयम शिकतात

मी मुलांकडून काय शिकलो?

मी गेल्या ३० वर्षांत अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. तुमचा विद्यार्थी खेळात काही बक्षीस मिळवतो तेव्हा खूप समाधान मिळते. मला आत्तापर्यंत आवडलेला अनुभव म्हणजे ४ वर्षे वयाच्या मुलांना ट्रेनिंग देणे. त्यांच्याकडून हवे ते करून घेणे खरोखरच आव्हानात्मक असते. त्यांना शिकवण्यासाठी आपल्याला त्यांच्या पातळीवर (शारीरिकदृष्ट्या देखील) जावे लागते. शिकवताना कोचने त्यांचे मानसशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. आवडणाऱ्या गोष्टी त्यांना करायला मिळाल्यास ते सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यांना कोणतीही शिक्षा किंवा कठोरपणे बोलणे उपयोगाचे नसते. मी माझ्या ट्रेनिंगमधल्या कोणत्याही गोष्टींशी तडजोड न करता ते मजेदार आणि आनंददायक बनवायला शिकलो. मला त्यांच्या वागणुकीचे अनेक वेगवेगळे नमुने बघायला मिळाले. त्यांची मानसिकता, त्यांची संवाद साधण्याची पद्धत, काही विशिष्ट परिस्थितींना त्यांनी दिलेला प्रतिसाद, या सर्व गोष्टींमुळे मी मुलांना नवीन गोष्टी शिकवण्यासाठी प्रवृत्त झालो. मी त्यांच्या हालचाली, वागणूक, प्रतिसाद, प्रत्येक परिस्थितीसाठी प्रतिक्रियांचे निरीक्षण करत गेलो आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करायला शिकलो. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मुलांच्या नैसर्गिक गुणांना सुरुवातीच्या काळात चॅनेलाइज केले पाहिजे. त्यासाठी सहा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

१. लवकर सुरुवात

२. तज्ज्ञांचे मार्गदर्शन

३. जाणीवपूर्वक सराव

४. उत्कृष्टता प्राप्त करण्याचे केंद्र

५. ध्येय निश्चिती

६. जे काही केले त्यातून आनंद मिळवणे

किशोरवयीन खेळाडूंना प्रशिक्षण देणे हा ही एक वेगळा अनुभव होता. त्यांना परिस्थितीची चांगली जाण असते आणि ते सूचना व्यवस्थित ऐकतात. ॲथलिटसाठी गंभीर असण्यापेक्षा स्ट्रीट स्मार्ट असणे खूप आवश्यक आहे. स्ट्रीट स्मार्ट आहे तो गंभीर प्रकारच्या ॲथलिट्सपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो. स्ट्रीट स्मार्ट असणे म्हणजे जीवन अधिक खेळकर होण्यासाठी जोखीम पत्करणे होय. खेळकर, खोडकर मानसिकता आणि वृत्ती असलेल्या व्यक्तीशी मैत्री करायला सगळ्यांना आवडते. काही लोक नैसर्गिकरित्या इतरांपेक्षा अधिक उत्स्फूर्त आणि खेळकर असतात, परंतु कोणतीही परिस्थिती कोणीही थोडासा खोडकरपणा शिकून बदलू शकतो. कोणताही खेळाडू खेळ न खेळणाऱ्या इतर मुलांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो कारण त्याचा मेंदू परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्यापेक्षा चांगले पर्याय शोधू शकतो. ॲथलिट्स हे चांगले पर्याय कसे मिळवतात हे समजून घेण्यासाठी, न्यूरोशास्त्रज्ञांनी प्रयोग सुरु केले आहेत; ज्यामध्ये ॲथलिट आणि नॉन-ॲथलिट समान क्रिया करतात.

लहानग्यांसोबत काम करणे, प्रशिक्षण देणे आणि बराच वेळ घालवणे ही संधी मिळणे हे भाग्याचे आहे असे मी मानतो. आपण मुलांवर अनेक प्रयोग करू शकतो, ते नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात.

मुलांना शिकवणे आणि त्यांच्यासोबत काम करणे यामुळे मला त्यांच्या संकल्पना विकासावर प्रभाव पाडण्यास मदत करते. तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी ही संधी माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com