
नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असेल आणि तुम्ही पदवीधर असाल, तर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत असलेला मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए) या दोन वर्षांच्या पदव्युत्तर प्रोग्रॅम बद्दल विचार करायलाच हवा!
‘एमसीए’ : आय.टी. क्षेत्रात सुसंधी
- डॉ. दीपाली सवाई
आजच्या ‘डिजिटल इंडियाच्या’ जमान्यात, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान हे वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या सगळ्याचा घटक व्हायची इच्छा असेल, नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असेल आणि तुम्ही पदवीधर असाल, तर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत असलेला मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए) या दोन वर्षांच्या पदव्युत्तर प्रोग्रॅम बद्दल विचार करायलाच हवा! शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांच्या सूचना विचारात घेऊन, या प्रोग्रॅममध्ये बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत असे बदल करण्यात आले आहेत. संकल्पना, कौशल्य, प्रात्याक्षिके आणि प्रकल्प अशा चारही गोष्टींवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, डीप लर्निंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग , डेव्हॉप्स, आयओटी, डाटा अनॅलिटिक्सबरोबरच जलद गतीने बदलत जाणारे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी अभ्यासक्रमात केलेला सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक सत्रामध्ये दिलेले दोन विषय, जे विद्यार्थ्यांना स्वतःचा कल आणि आवडीचा विचार करून निवडता येतील. सहाजिकच रोजगाराच्या अनेक संधी या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे विस्तारल्या आहेत.
एमसीए पदवीधरांना संधी
सॉफ्टवेअर व मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपर ः मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेब डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर ऑटोमेशन, ही प्रत्येक उद्योगाची गरज आहे.
डेटाबेस इंजिनिअर, ॲडमिनिस्ट्रेटर, बिग डाटा अनॅलिस्ट ः खूप मोठ्या प्रमाणात डेटा साठवणे, त्याचे विश्लेषण करणे ही प्रत्येक उद्योगाची गरज आहे.
सोशल मीडिया हँडलर आणि डिजिटल मार्केटिंग मॅनेजर ः ज्यांना प्रोग्रामिंगमध्ये फार रस नाही त्यांच्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग हे एक चांगले करिअर आहे.
नेटवर्किंग, इंफ्रास्ट्रक्चर आणि सिक्युरिटी ः सॉफ्टवेअर, हार्डवेअरमध्ये इंफ्रास्ट्रक्चर आणि सिक्युरिटीमध्ये असलेल्या संधी, नेटवर्किंग व केलेले प्रकल्प राबविण्यात व नंतर लागणाऱ्या सपोर्ट सिस्टीममध्ये विविध संधी आहेत.
इन्फॉर्मेशन आणि क्वालिटी मॅनेजमेंट ः सॉफ्टवेअर टेस्टिंग, मेंटेनन्समध्ये भरपूर संधी आहेत.
टेक्निकल रायटर/तांत्रिक लेखक : टेक्नॉलॉजीचे ज्ञान आणि उत्तम इंग्लिश येत असलेल्या लोकांना यामध्ये करिअर करण्याची संधी आहे.
एमसीए पदवीधर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप आयटी कंपन्या, कन्सल्टन्सी फर्म्स, बँका तसेच सरकारी नोकरी, असे उत्तम रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. आयटी उद्योगातील पात्र व्यावसायिकांची कमतरता एमसीए पदवीधर विद्यार्थी नक्कीच पूर्ण करेल.
प्रवेशासाठी पात्रता : या कोर्सची अर्हता नवी दिल्लीच्या एआयसीटीई व डीटीई, महाराष्ट्राने ठरवलेली आहे. यासाठी १०+२ किंवा पदवी स्तरावर गणित हा विषय असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेत कमीत कमी ५० टक्के (४५ टक्के राखीव गटासाठी) गुण व डीटीइई, महाराष्ट्रची MAH-MCA-CET ही पास करणे आवश्यक आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. https://mcacet2022.mahacet.org या वेब साइटवर परीक्षेच्या तारखेविषयी अधिक माहिती मिळू शकेल.
Web Title: Mca Opportunities In The Field It Digital India Savitribai Phule Of Pune University
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..