MPSCकडून आंदोलकांवर होणार कारवाई; आयोगाचा संघटनांना इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे.
mpsc
mpsc esakal

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आयोगाकडून अशा आंदोलकांवर कारवाई केली जाणार असल्याचे निर्देश दिले आहेत. (MPSC Syllabus Changed Update)

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम बदलला होता. यामुळे काही विद्यार्थांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून अशा घटनांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

"राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल." असं ट्वीट करत आयोगाने आंदोलकांना इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com