नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमावर एमपीएससी ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम कोणतीही तडजोड न करता २०२३ पासूनच लागू करण्यात येणार.

नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमावर एमपीएससी ठाम

पुणे - राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम कोणतीही तडजोड न करता २०२३ पासूनच लागू करण्यात येणार आहे. अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतली आहे. या संबंधीचे परिपत्रकही आयोगाने नुकतेच ट्वीट केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणेच राज्यसेवेची मुख्य परिक्षाही वर्णनात्मक करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. ही नवीन परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचे परिपत्रकही काढले आहे. मात्र ही अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलावी, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात येत होत्या. या मागणीला केराची टोपली दाखवत आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

परिपत्रकात आयोग म्हणते, ‘‘राज्यसेवेच्या परीक्षेतील बदल २०२४ अथवा २०२५ पासून लागू करण्यासाठी आयोगावर दबाव टाकण्यात येत आहे. काही स्वयंघोषित संघटना, खासगी क्लासेस आणि उमेदवार इत्यादींच्या पुढाकाराने ही मोहीम राबविण्यात येत आहे. उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कोणत्याही संघटित अथवा असंघटित दबावाची आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही. आयोगाच्या निर्णयानुसार नवीन परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमानुसारच २०२३ ची पूर्व आणि मुख्य परीक्षा होईल.’

परीक्षा कशी घ्यावी हे आयोगाचे स्वातंत्र्य मान्य आहे. मात्र विद्यार्थ्यांवर आयोगाच्या चुकीमुळे अन्याय होणार नाही. याची दखल आयोगाने घ्यायला हवी. आयोगाने आता ‘चुकीचे प्रश्न’, ‘रद्द होणारे प्रश्न’, ‘कॉल सेंटर’,‘निकाल’ याकडे लक्ष द्यायला हवे.

- श्रीकांत पुरी

आयोगाच्या निर्णयाचे स्वागत आहे. काळानुसार बदल हा पाहिजेच, पण आपण निर्णय देऊन १५ दिवस झाले. पण अजूनही अभ्यासक्रम नाही दिला, असे कसे चालेल.

- मनोज शेवाळे

Web Title: Mpsc Insists On New Examination Plan And Syllabus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..