
MPSC Recruitment : सहकार, पाणीपुरवठा विभागात नोकरीची संधी, ऐवढ्या पदांसाठी MPSC ची जाहिरात
नवीन परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याचा निर्णय काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला. त्यानंतर आज MPSC कडून विविध विभागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्वीट करण्यात आले आहेत.
सहकार, पाणीपुरवठा विभागासह इतर अन्य विभागांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. विविध 21 पदासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
कोणत्या विभागात किती जागा?
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातील सांस्कृतिक कार्य संचालनालयातील सहायक संचालक, गट-ब या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील रेशीम संचालनालयातील रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा,श्रेणी-1, गट-ब या संवर्गातील 03 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील वस्त्रोद्योग संचालनालयातील सहायक आयुक्त (तांत्रिक), गट-ब या संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक रसायनी, गट-ब या संवर्गातील 2 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील मुख्य खोदन अभियंता, गट-अ या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील उपसंचालक, गट-अ या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील उपअभियंता (विद्युत), गट-अ या संवर्गातील 9 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (002/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातील रेशीम संचालनालयातील सहायक संचालक, राज्य रेशीम सेवा, गट-अ या संवर्गातील 01 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहायक प्रशासन अधिकारी, गट-ब या संवर्गातील 1 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.