"एनसीसी'ला पर्यायी कोर्स म्हणून जोडण्यासाठी यूजीसीच्या विद्यापीठांना सूचना !

एनसीसीला मिळणार विद्यापीठांमध्ये जनरल इलेक्‍टिव्ह क्रेडिट कोर्स
NCC
NCCGoogle

सोलापूर : यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे 2021 : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) जनरल इलेक्‍टिव्ह क्रेडिट कोर्स (जीईसीसी) म्हणून समाविष्ट करण्याच्या सूचना सर्व भारतीय विद्यापीठांना दिल्या आहेत.

गुरुवारी, 15 एप्रिल 2021 रोजी आयोगाने बजावलेल्या नोटिशीनुसार, यूजीसीने एनसीसी महासंचालनालयाकडून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता एकूण 6 सेमिस्टरसाठी 24 क्रेडिट्‌सद्वारे केलेल्या शिफारशीच्या आधारे एनसीसीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अर्थात, यशस्वी प्रशिक्षणासाठी हा कोर्स निवडलेल्या विद्यार्थ्यांना एनसीसी "बी' आणि त्यानंतर एनसीसी "सी' प्रमाणपत्र दिले जाईल. एनसीसी केलेल्या उमेदवारांना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश तसेच रोजगार प्रोत्साहन तसेच केंद्रातील आणि विविध राज्यांतील सरकारी नोकरीमध्ये संधी दिली जाते. या लाभाची राज्यवार यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत नोटीसच्या लिंकवर जा.

https://www.ugc.ac.in/pdfnews/0420449_NCC-general-elective-credit-course.pdf

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे प्रेरित पाऊल

यूजीसीने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार एनसीसीला विद्यापीठांमध्ये जनरल इलेक्‍टिव्ह क्रेडिट कोर्स उपलब्ध करण्याचा निर्णय हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीमुळे झाला आहे. "चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम' (सीबीसीएस) ने एनईपी 2020 मधील पदव्युत्तर आणि उच्च स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये लागू करण्याची शिफारस केली आहे, ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठांद्वारा निर्धारित कोर्स / अभ्यासक्रमाऐवजी आपल्या पसंतीचा अभ्यासक्रम / त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थ्यांना हे विषय / अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर क्रेडिट दिले जाईल आणि संपूर्ण कोर्सची पूर्तता केल्यावर पदवी दिली जाईल.

एनसीसीसाठी 6 सेमिस्टरमध्ये 24 क्रेडिट्‌स

एनईपी 2020 च्या सीबीसीएस नुसार एनसीसी महासंचालनालयाने विद्यापीठांमधील 6 सेमिस्टरमधील एकूण 24 क्रेडिट्‌ससाठी फक्त एनसीसी "बी' आणि "सी' प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. अधिकृत अद्ययावत माहितीनुसार पहिल्या दोन सेमिस्टरमध्ये एकूण 4 क्रेडिट्‌स, तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमधील एकूण 10 क्रेडिट्‌स आणि पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये एकूण 10 क्रेडिट्‌सचे वाटप करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com