esakal | NEET Exam : विद्यार्थ्यांना अतिरिक्‍त प्रश्‍नांचा पर्याय; प्रश्‍नपत्रिकेच्‍या रचनेत बदल
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam

NEET Exam : विद्यार्थ्यांना अतिरिक्‍त प्रश्‍नांचा पर्याय

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर होत असलेल्‍या नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२१ च्‍या प्रश्‍नपत्रिकेच्‍या रचनेत बदल केले आहेत. एनटीएने जारी केलेल्‍या सूचनेनुसार विद्यार्थ्यांना अतिरिक्‍त प्रश्‍न दिले जाणार आहेत. प्रत्‍येकी चार गुणांसाठी असे १८० प्रश्‍नांची ७२० गुणांसाठी परीक्षा होईल. चुकीच्‍या उत्तरासाठी एक गुणाची कपात होईल, तर अनुत्तरित प्रश्‍नासाठी गुणकपात लागू नसेल. (NEET-Exam-Students-have-choice-of-additional-questions-jpd93)

कोरोनामुळे यंदा प्रश्‍नपत्रिकेच्‍या रचनेत बदल, अशी आहे रचना...

कोरोना महामारीमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन स्‍वरुपातच झालेले आहे. अशात नीट परीक्षेच्‍या शिक्षणक्रमात कपात करण्याची मागणी विविध स्तरावरून होत होती. त्‍यावर पर्याय म्‍हणून एनटीएने अतिरिक्‍त प्रश्‍नांची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्‍ध करून दिली आहे. परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्‍नपत्रिकेची रचना समजून घेणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फिजिक्‍स, केमिस्‍ट्री, बॉटनी, झुऑलॉजी अशा चार विषयांचे प्रत्‍येकी पन्नास प्रश्‍न विचारले जातील. यापैकी ४५ प्रश्‍न असे चारही विषय मिळून १८० प्रश्‍न सोडवायचे असून त्‍यासाठी एकूण ७२० गुण असतील. प्रत्‍येक चुकीच्‍या उत्तरासाठी एक गुणाची कपात केली जाईल. महत्त्वपूर्ण बदल म्‍हणजे प्रत्‍येक विषयात अ (ए) आणि ब (बी) असे दोन भाग (सेक्‍शन) केलेले आहेत. अ भागात ३५ प्रश्‍न, तर ब भागात १५ प्रश्‍नांचा समावेश असेल. ए भागातील सर्व ३५ प्रश्‍न सोडविणे बंधनकारक असेल. तर ब गटातील १५ प्रश्‍नांपैकी कुठलेही दहा प्रश्‍न सोडविण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल.

नोंदणीसाठी ७ ऑगस्‍टपर्यंत मुदत

नीट परीक्षेच्‍या नोंदणीसाठी ७ ऑगस्‍टपर्यंत मुदत आहे. अर्जात दुरुस्‍तीसाठी ८ ते १२ ऑगस्‍टदरम्‍यान मुदत असेल. २० ऑगस्‍टला परीक्षा केंद्र असलेल्‍या शहरांबाबतची घोषणा केली जाईल्‍. परीक्षेच्‍या तीन दिवस आधी प्रवेशपत्र जारी केले जाईल. १२ सप्‍टेंबरला दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा होईल.

अर्ज दोन टप्‍यांत भरण्याची सुविधा

विद्यार्थ्यांच्‍या सुविधेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्‍यांत विभागली आहे. यात पहिल्‍या टप्‍यातील माहिती अर्जाच्‍या अंतिम मुदतीपर्यंत म्‍हणजे ७ ऑगस्‍टपर्यंत भरायची आहे. तर दुसऱ्या टप्‍यातील माहिती निकाल लागण्यापूर्वी भरावी लागणार आहे. परीक्षेसंदर्भातील सविस्‍तर सूचनापत्र एनटीएने जारी केले आहे.

हेही वाचा: कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

हेही वाचा: Good News - आता दाखल्याशिवाय मिळणार शाळेत प्रवेश

loading image