esakal | NEET परीक्षा येत्या रविवारीच होणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

NEET UG

सर्वोच्च न्यायालयाने १२ सप्टेंबरला होणारी NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

NEET परीक्षा येत्या रविवारीच होणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने १२ सप्टेंबरला होणारी NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. NEET UG Exam २०२१ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने सांगितलं होतं की, परीक्षेची तारीख सीबीएसई कंपार्टमेंट, प्रायव्हेट आणि इतर परीक्षेच्या दिवशी होत आहे. मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, नीट परीक्षा ठरलेल्या दिवशीच येत्या रविवारी १२ सप्टेंबर रोजी होईल.

न्यायालयाने म्हटलं की,'नीट परीक्षेला १६ लाखांहून जास्त विद्यार्थी बसणार आहेत. काही विद्यार्थ्यांच्या याचिकेवरून परीक्षेला टाळता येणार नाही. न्यायाधीश एएम खानविलकर, न्यायाधीश हृषिकेश रॉय आणि न्यायाधीश सीटी रवि कुमार यांच्या पीठाने सांगितलं की, आम्ही या याचिकेवर सुनावणी करणार नाही. आम्हाला अनिश्चिततेची स्थिती नको आहे. परीक्षा होऊ दे.'

हेही वाचा: सरकारसोबत आम्हाला संघर्ष नकोय; केंद्राला SC ने फटकारले

नॅशनल टेस्ट एजन्सीने ३ सप्टेंबरला पीठासमोर असं सांगितलं होतं की, ज्यांच्या परीक्षेचे निकाल जाहीर झालेले नाहीत त्यांनाही नीटसाठी बसता येईल. परीक्षेच्या निकालाची गरज काउन्सिलिंगच्या वेळी असणार आहे. त्याआधी निकाल गरजेचा नाही. सर्वोच्च न्यायालायत परीक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका वकील सुमंथ नकुला यांनी दाखल केली होती.

loading image
go to top